News Flash

तापसी पन्नूच्या ब्रेकअपची अफवा

ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेता बॅडमिंटनपटूला तापसी डेट करत आहे.

तापसी पन्नू, मॅथिअस बोई

‘नाम शबाना’, ‘बेबी’, ‘पिंक’ अशा राष्ट्रभक्तीपर आणि सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांतील अभिनयासाठी अभिनेत्री तापसी पन्नू प्रसिद्ध आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा २’या विनोदीपटातून तापसीने तिच्यातील अभिनय कौशल्याचा आणखी एक पैलू दाखविला. केवळ गंभीर विषयावर आधारित चित्रपटच नाही तर विनोदीपटांमध्येही ती तितकीच चांगली भूमिका करू शकते हे तिने दाखवून दिले. एकंदरीत तिच्या चित्रपटांना मिळत असलेले यश पाहता तापसीच्या करिअरचा आलेख उंचावत असल्याचे दिसते. पण, तिच्या वैयक्तिक आयुष्यात खळबळ माजल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती.

वाचा : ‘एक बॉम्ब कमी तयार करा, पण सॅनिटरी नॅपकिन मोफत द्या’

ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेता बॅडमिंटनपटू मॅथिअस बोई याला तापसी डेट करत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याचं वृत्त होते. इतकेच नव्हे तर त्यांनी ब्रेकअप केल्याचेही म्हटले जात होते. तापसीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीच्या येण्यामुळेच त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले गेले. मात्र, या सर्व अफवा असल्याची माहिती तापसीच्या जवळच्या सुत्रांनी दिली. ‘ते दोघही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याला एकत्र गेले होते. तापसीची बहिण शगुण हिचीसुद्धा मॅथिअसची चांगली ओळख असून, तीसुद्धा त्यांच्यासोबत गेली होती. पण, नववर्षाच्या सुरुवातील ते एकत्र नव्हते. कारण मॅथिअसला १ जानेवारीला होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी लखनऊला येणे गरजेचे होते’, असे सुत्रांनी सांगितले.

मॅथिअसचे आई-वडील जेव्हा कधी भारतात येतात तेव्हा ते न चुकता तापसीची भेट घेतात. २०१३ साली झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या वेळी तापसी आणि मॅथिअसची ओळख झाली. त्यानंतरच या दोघांमधील जवळीक वाढल्याचे म्हटले जाते.

वाचा : संजय कपूरच्या करिअरची गाडी रुळावर येईना!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तापसीने ती जोडीदार म्हणून क्रिकेटपटू किंवा श्रीमंत व्यावसायिकाची निवड करणार नसल्याचे म्हटले होते. ‘माझे वैयक्तिक आयुष्य खासगी राहावे यासाठी मी फार काही प्रयत्न करत नाही. मी कोणी क्रिकेटपटू, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता किंवा एखाद्या मोठ्या भारतीय व्यावसायिकाला डेट करत नाहीये. मी लग्न करेन तेव्हा असा गजबजाट होणार नाही. सध्या बरेचजण लग्न करत आहेत. पण, मी लग्न करेन त्यावेळी भारतातील प्रसार माध्यमांना यात इतका रस असेल असे मला वाटत नाही. हे मात्र नक्की की माझं लग्न क्रिकेटपटू किंवा व्यावसायकाशी होणार नाही’, असे ती म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 11:53 am

Web Title: all is well between taapsee pannu and her alleged beau mathias boe
Next Stories
1 ‘वयाच्या २० व्या वर्षापासूनच मासिक पाळीविषयी माहिती होती’
2 ‘एक बॉम्ब कमी तयार करा, पण सॅनिटरी नॅपकिन मोफत द्या’
3 ‘पद्मावत’च्या मदतीला सरसावणार केंद्र सरकार?
Just Now!
X