27 February 2021

News Flash

video: ‘रेस ३’ मधील तिसरं गाणं ऐकलंत का ?

काही दिवसापूर्वीच ‘रेस ३’  या चित्रपटामधील 'सेल्फिश' आणि 'हीरिए' ही दोन गाणी प्रदर्शित झाली.

रेस ३

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सलमान खान सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वीच ‘रेस ३’  या चित्रपटामधील ‘सेल्फिश’ आणि ‘हीरिए’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली. यापैकी ‘हीरिए’ या गाण्याला विशेष पसंती मिळाली नसली तरी ‘सेल्फिश’ या गाण्याने मात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या दोन गाण्यानंतर आता ‘रेस ३’ मधलं आणखी एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

भाईजानच्या ‘रेस ३’ मधलं ‘अल्लाह दुहाई है’ हे तिसरं गाणं प्रदर्शित झालं असून हे गाणं कमी कालावधी प्रचंड व्हायरल झालं आहे.  ‘रेस ३’ च्या पहिल्या दोन्ही गाण्यांपेक्षा या गाण्याला प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळत आहे. या गाण्यामध्ये सलमान खान स्वत: थिरकला असून जॅकलीन फर्नांडिस आणि डेजी शहा या दोघींनीही त्याला साथ दिली आहे. त्यामुळे या तिघांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत.

‘अल्लाह दुहाई है’ या गाण्यात सलमान एका नव्या अंदाजात पहायला मिळणार असून त्याचा डान्सही जरा हटकेच आहे. यात सलमानने काळ्या रंगाचे जॅकेट घातले असून त्याने केलेल्या लिपसिंकमुळे हे गाणं तो स्वत: च म्हणत असल्याचा भास अनेक वेळा होतांना दिसत आहे. या गाण्याचा व्हिडिओ सलमानने नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान, ‘रेस ३’ हा चित्रपट येत्या १५ जूनला म्हणजेच ईदला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने यामध्ये जॅकलीन फर्नांडिस,बॉबी देओल, अनिल कपूर आणि डेजी शहा हे स्क्रिन शेअर करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून या चित्रपटातील गाणी, मेकिंग व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या चित्रपटाला मिळत असलेली लोकप्रियता पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल असे दिसून येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 10:00 am

Web Title: allah duhai hai song release race 3
Next Stories
1 गोविंदा माझे आयडॉल! व्हायरल झालेल्या डान्सर काकांची प्रतिक्रिया
2 जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला ‘भावेश जोशी’
3 bigg boss marathi : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “सत्कार मूर्ती” कॅप्टनसीचे कार्य
Just Now!
X