सलमान खान आणि करिना कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ला दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. बंदेलखंड विकास समिती संस्थने ही याचिका दाखल केली होती.
याचिकेमध्ये “बजरंगी भाईजान‘ या चित्रपटामुळे बहुसंख्य समुदायाच्या धार्मिक भावना दुखावतील असे म्हटले आहे. चित्रकूट येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल प्रधान यांनी याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा याचे कोणतेही ठोस कारण आढळून येत नाही‘ असे म्हणत न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या खंडपीठाने ही जनहित याचिका फेटाळून लावली आहे. फेटाळून लावली आहे.
नवाझुद्दिन सिद्दीकी, करिना कपूर यांच्यासह अन्य कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.