News Flash

अल्लू अर्जुनची ४ वर्षाची मुलगी समांथा अक्किनेनीसोबत झळकणार, साउथ सिनेमातून अभिनयात पदार्पण

अल्लू अर्जुनची चार वर्षाची मुलगी अल्लू अरहा साउथ फिल्मध्ये डेब्यू करणार आहे. अल्लू परिवारातील चौथी पिढी अल्लू अरहा.

साउथचे सुपरस्टार प्रसिद्धीच्या बाबतीत काही कमी नाहीत. चिंरजीवी पासून ते विजय देवरकोंडापर्यंत असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी लोकप्रियतेच्या तुलनेत बॉलिवूड सुपरस्टार्सना देखील मागे टाकलंय. यातलाच एक साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुन हा एक साउथ फिल्ममधला लोकप्रिय चेहरा ठरलाय. आता त्याची चार वर्षाची मुलगी अल्लू अरहा साउथ फिल्मध्ये डेब्यू करणार आहे. लवकरच ती अभिनेत्री सामंथा अक्किनेनी सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘शकुंतलम’ असं तिच्या चित्रपटाचं नाव आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलीय.

अल्लू परिवारच्या तीन पिढ्या साउथ फिल्ममध्ये करत आहेत काम

अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्याने मुलगी अरहासोबतचा एक फोटो जोडलाय. हा फोटो शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “अल्लू परिवारातर्फे ही घोषणा करताना गर्व वाटतोय की अल्लू परिवाराची चौथी पिढी अल्लू अरहा शकुंतलम चित्रपटातून सुरवात करणार आहे. शकुंतलम चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्सना माझ्याकडून शुभेच्छा.”, असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुनच्या परिवारातील गेल्या तीन पिढ्या साउथ फिल्ममध्ये काम करत आहेत. त्याचे आजोबा, वडील आणि त्यानंतर अल्लू अर्जुन स्वतः साउथ फिल्मसोबत जोडला गेलाय. आता याच कुटुंबातील चौथी पिढी अल्लू अरहा साउथ फिल्ममध्ये आपलं पहिलं पाऊल टाकणार आहे. अभिनेत्री सामंथा अक्किनेनीने यापूर्वी अल्लू अर्जूनसोबत अनेकदा स्क्रीन शेअर केलीय. त्यानंतर आता त्याच्या चार वर्षाच्या मुलीसोबत सामंथा स्क्रीन शेअर करणार आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये याचा उल्लेख देखील केलाय. यात त्याने लिहिलंय, “सामंथासोबत त्याचा प्रवास खूपच वेगळा ठरला. आता त्याच्या मुलीसोबत सामंथासुद्धा काम करणार असल्याने खूप आनंद होतोय.”

‘पुष्पा’ चित्रपटातून भेटीला येणार अल्लू अर्जून

अल्लू अर्जुनच्या बाबतीत सांगायचं झालं तर लवकरच रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा’ चित्रपटातून तो भेटीला येतोय. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनचा लूक आणि रोल हा आतापर्यंत कधीच न पाहिलेला असा असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 7:01 pm

Web Title: allu arjun 4 year old daughter allu arha is going to debut in shakuntlam with samantha akkineni prp 93
Next Stories
1 “खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म देण्याच्या विचारानेच…”, प्रसूतीच्या ‘त्या’ सीनवर क्रिती सेनॉन म्हणाली..
2 ए आर रहमान आणि अनन्या बिर्ला यांचे टोकियो ऑलिम्पिकसाठी ट्रिब्युट गाणे ‘हिंदुस्थानी वे’ झाले प्रदर्शित
3 ‘माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे मी मुलाला लाँच केले नाही’, परेश रावल यांचा खुलासा
Just Now!
X