News Flash

अल्लू अर्जुनने घेतली सलमान-शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन

या व्हॅनिटी व्हॅनवर 'AA' असा लोगो काढण्यात आला आहे

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या स्टाईलसाठी लोकप्रिय आहे. अल्लू अर्जुन ज्याप्रमाणे नवनवीन स्टाईल करत असतो त्याच प्रमाणे तो वेगवेगळ्या स्टाईलच्या गाड्यादेखील घेताना दिसतो. अल्लू अर्जुनकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत. अनेकदा अल्लू अर्जुन त्याच्या या महागड्या गाड्या घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना दिसतो. आता अल्लू अर्जुनने त्याच्या या गाड्यांमध्ये आणखी एका गाडीचा समावेश केला आहे. ही एक साधीसुधी गाडी नसून व्हॅनिटी व्हॅन आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर या व्हॅनिटी व्हॅनसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ही एक साधीसुधी व्हॅन नसून अल्लू अर्जुनने ती खास स्वत:साठी Reddy Customद्वारे तयार करु घेतली आहे. या व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. तसेच या व्हॅनवर ‘AA’ असा लोगो काढण्यात आला आहे. ही व्हॅन काळ्या रंगाची असून व्हॅनच्या आत देखील काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनचे व्हॅनसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या अल्लू अर्जुन त्याचा आगमी चित्रपट ‘AA19’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह अभिनेत्री पूजा हेगडेदेखील दिसणार आहे. दरम्यान अल्लु अर्जुन ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन चित्रीकरणास पोहोचतो. तेव्हा पासून त्याच्या या गाडीची चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 4:23 pm

Web Title: allu arjun new vanity van avb 95
Next Stories
1 दिशासोबत डिनर डेटला गेल्यावर बिल कोण भरतं? टायगर म्हणतो..
2 माझ्यासमोर उभं राहण्याची ताकद फक्त या अभिनेत्यामध्ये – हृतिक रोशन
3 Video : स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!
Just Now!
X