26 February 2021

News Flash

प्रसन्नसमोर उघड झालं सई आणि नचिकेतच्या प्रेमाचं सत्य

'ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण' या मालिकेला नवे वळण

‘ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. यातच सई, नचिकेत आणि नचिकेतची थेट ऑस्ट्रेलियावरुन आलेली मैत्रीण कॅडी यांचा प्रेमाचा त्रिकोण बनणार नाही ना असे विचार करता करता प्रेक्षकांचा दमछाक होतेय. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. आता यातच नवीन ट्विस्ट मालिकेच्या क्रिएटीव्ह टिमने आणलंय हे ट्विस्ट आहे सईच्या वडिलांचं म्हणजेच प्रसन्नचं.

प्रसन्नला सई आणि नचिकेत यांच्या प्रेमाचं सत्य कळतं आणि मुलीची काळजी असलेल्या वडिलांप्रमाणे तो या प्रेमाला अप्पांपासून लपवून ठेवण्याच्या सई नचिकेतच्या कटामध्ये सामीलही होतो. अर्थात प्रसन्नची ही भूमिका इतक्या सहजासहजी मालिकेमध्ये पहायला मिळत नाही बरं. प्रसन्नला जेव्हा कळतं की सई आणि नचिकेतचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा सुरुवातीला तोही नाराज होतो. आणि या प्रेमाला विरोधही करतो. मात्र आजीच्या सांगण्यावरुन त्याची नाराजी काहीशी कमी होते आणि तोही नचिकेतला काही दिवसांची मुदत द्यायचे ठरवतो.

प्रसन्न नचिकेतला आठ दिवसांची मुदत देतो ज्या दरम्यान त्याला अप्पांना त्याच्या आणि सईबद्दल सर्व काही सांगावं लागणारे. जर त्याने तसं नाही केलं तर नवव्या दिवशी तो स्वतः अप्पांना सत्य सांगणार असल्याचंही नचिकेत आणि सईसमोर स्पष्ट करतो. थोडक्यात आता नचिकेतला अप्पांसोबत प्रसन्नलाही प्रसन्न करायचं आव्हान मिळालंय आणि तेही काही मोजक्या दिवसांमध्ये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 2:34 pm

Web Title: almost sufal sampurnam avb 95
Next Stories
1 ‘क्रिश’, ‘रा-वन’ला टक्कर देणार शक्तिमान
2 ‘मी जिवंत आहे’, श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री
3 सहा महिन्यांनी सलमान शूटिंगसाठी सेटवर; फोटो शेअर करत सांगितला अनुभव
Just Now!
X