News Flash

#MeToo : आलोक नाथ यांनी माझ्यासमोरच कपडे उतरविले, महिलेचा आरोप

प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला.

आलोक नाथ

#MeTooअभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरुद्ध आवाज उठविल्यापासून अनेक महिला #MeToo या मोहिमेअंतर्गत व्यक्त होत आहे. यामध्ये अनेक महिलांनी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर पुन्हा एकदा एका महिलनेही आरोप केले आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. विनता नंदा यांच्या आरोपानंतर अभिनेत्री सई ताम्हणकरनेही ट्विटरच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या सेटवरील एक महिलेने आलोक नाथ यांच्यावर आरोप केले आहेत.

‘हम साथ साथ है’ च्या शेवटच्या टप्प्यातील चित्रीकरण सुरु असताना तिच्यासोबत आलोक नाथ यांनी गैरवर्तन केल्याचं या महिलेने सांगितलं आहे. ‘चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण रात्री उशीरापर्यंत सुरु होतं. हे चित्रीकरण झाल्यानंतर मी आलोक नाथ यांच्या चेंजिंग रुममध्ये त्यांचे कपडे देण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी ते माझ्यासमोरच कपडे बदलू लागले. इतकचं नाही तर मी हा प्रकार पाहून तेथून निघण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा हात पकडून माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप या महिलेने केला आहे.

पुढे ती असंही म्हणाली, ‘ही हकीकत मी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सांगणार होते. परंतु मी प्रचंड घाबरले होते. आलोक नाथ हे सूरज बडजात्याचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी ही गोष्ट त्यांना सांगितली नाही. मात्र या घटनेमुळे मला प्रचंड धक्का बसला होता’.

दरम्यान, दिग्दर्शिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर आरोप केल्यानंतर ‘तारा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नवनीत निशान यांनीसुद्धा अभिनेते आलोक नाथ यांच्यावर आरोप केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 10:40 am

Web Title: alok nath accused of sexual harassment by crew member of hum sath sath hai
टॅग : MeToo
Next Stories
1 #MeToo : सोना मोहापात्रचाही कैलाश खेरवर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप
2 #MeToo : गायक अभिजीतने केला होता चुंबन घेण्याचा प्रयत्न, महिलेचा आरोप
3 #MeToo  ‘मी टू’चे वादळ कायम
Just Now!
X