मनोरंजन विश्वात ‘संस्कारी बाबुजी’ अशी ओळख असलेल्या अभिनेता आलोक नाथ यांच्यावर मनोरंजन विश्वातल्या अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुक, बलात्कारसारखे गंभीर आरोप केले. त्यानंतर ‘सिंटा’ म्हणजेच ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’नं आलोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीला आलोक नाथ यांनी उत्तर दिलं आहे.

रिमा लागू यांच्यामुळे आलोक नाथांपासून वाचले- संध्या मृदुल

नोटिसीला उत्तर देताना आलोक नाथ यांनी आपल्यावर असलेले सर्व लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप फेटाळून लावले आहे. ‘सिंटा’ नं पाठवलेल्या नोटिसीला आलोक यांनी उत्तर दिल्याची माहिती आलोक नाथ यांचे वकिल अशोक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

#MeToo : आलोक नाथ यांनी माझ्यासमोरच कपडे उतरविले, महिलेचा आरोप

१९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. तसेच याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशांत यांनीदेखील आलोक नाथ यांच्या असभ्य वर्तनाचे पाढे वाचले होते. मनोरंजन विश्वात काम करणारी अभिनेत्री संध्या मृदुल हिनंदेखील आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर गेल्याच आठवड्यात सिंटानं आलोक नाथ यांना नोटीस पाठवली.  तसेच आलोक नाथ जर दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन सिंटाचे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी दिलं होतं.