News Flash

बलात्काराचा आरोप असलेले आलोक नाथ #MeTooवरील चित्रपटात न्यायाधीशाच्या भूमिकेत

या चित्रपटाच्या अखेरीस आलोक नाथ न्यायाधीश म्हणून विनयभंगावर भाष्य करताना दिसतील.

बलात्काराचा आरोप असलेले आलोक नाथ #MeTooवरील चित्रपटात न्यायाधीशाच्या भूमिकेत

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo (मीटू) मोहिमेला सुरुवात झाली. नंतर या वादळात बरीच मोठी नावं समोर आली. ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर जेव्हा दिग्दर्शिका- निर्मात्या विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. विनता यांच्यानंतरही काही अभिनेत्रींनी पुढे येत आलोक नाथांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. आता विरोधाभास म्हणजे आलोक नाथच #MeToo मोहिमेवरील चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका साकारणार आहेत.

बॉलिवूडमधील #MeToo मोहिमेवर ‘मैं भी’ हा चित्रपट येत असून नासिर खान त्याचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाविषयी विचारले असता आलोक नाथ म्हणाले, ‘सध्याच्या घडीला मी कोणताच चित्रपट करत नाहीये. पण काही महिन्यांपूर्वी मी एका चित्रपटासाठी शूटिंग केलं होतं. तुम्हाला त्याचा काही त्रास आहे का? मी चित्रपटात झळकणार म्हटल्यावर तुम्हाला का इतकं दु:ख होत आहे. निर्मात्यासाठी मी ही छोटीशी भूमिका साकारली आहे आणि त्याला प्रदर्शित होऊ द्या.’ या चित्रपटात खालिद सिद्दीकी, शावर अली, इम्रान खान, मुकेश खन्ना आणि शाहबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या अखेरीस आलोक नाथ न्यायाधीश म्हणून विनयभंगावर भाष्य करताना दिसतील, असं कळतंय.

विनता नंदा यांच्यानंतर अभिनेत्री संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी आणि दीपिका अमीन यांनी आलोक नाथांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतर ‘द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने त्यांना असोसिएशनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 11:37 am

Web Title: alok nath to be seen in film based on me too movement
Next Stories
1 हेरा फेरी ३ : खळखळून हसवायला येतंय हास्याचं त्रिकूट
2 Confirmed : इम्तियाज अलीच्या चित्रपटात सारा-कार्तिकची जोडी
3 ऑस्कर विजेता चित्रपट ‘ग्रीन बुक’ भारतात प्रदर्शित
Just Now!
X