26 November 2020

News Flash

आगामी चित्रपटांसाठी कंगना रणौतची मेहनत; शेअर केला फोटो

पाहा, कंगनाने शेअर केलेले फोटो

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने चर्चेत येत आहे. कधी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी अन्य कारणांमुळे ती सतत प्रकाशझोतात राहत आहे. मात्र, या सगळ्यातून बाहेर पडत कंगना आता तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकडे वळली आहे. अलिकडेच तिने थलायवी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु केलं आहे. विशेष म्हणजे थलायवीसोबतच तिने धाकड या चित्रपटासाठीदेखील खास मेहनत करण्यास सुरुवात केली आहे.

भाऊ अक्षतचं लग्नकार्य झाल्यानंतर कंगनाने थेट हैदराबाद गाठलं असून तिथे थलायवीच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासोबतच तिने धाकड या चित्रपटाचीदेखील तयारी सुरु केली आहे. कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगना वर्कआऊट करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

“मला मल्टीटास्क करायला आवडत नाही, पण या काळात सुरूवातीला जशी मेहनत घेतली आहे तशी मेहनत घेण गरजेच आहे. म्हणून मी ‘थलायवीच्या चित्रीकरणासोबत ‘धाकाड’च्या अॅक्शन रिहर्सलला सुरूवात केली आहे, असं कॅप्शन कंगनाने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, कंगना लवकरच ‘तेजस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 3:32 pm

Web Title: along with thalaivi kangna is preparing for dhakaad dcp98
Next Stories
1 आणखी एका हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित
2 अनुपम खेर यांचा मुलगा झाला बेरोजगार?; सोशल मीडियावरुन मागतोय काम
3 Bigg Boss च्या घरात होणार एकता कपूरची एंट्री; मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही सोबत दिसणार
Just Now!
X