News Flash

Home Trailer : ‘कॅम्पा कोला’वर आधारित वेब सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

या वेब सीरिजच्या माध्यमातून मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर वेब विश्वात पदार्पण करत आहेत

अल्ट बालाजीने आपल्या नव्या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच केला आहे. ‘होम’ असं या वेब सीरिजचं नाव असून मुंबईतील ‘कॅम्पा कोला’ इमारतीवरुन झालेल्या वादावर ही सीरिज आधारित असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. ही वेब सीरिज मध्यम वर्गीय कुटुंबावर आधारित असणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर वेब विश्वात पदार्पण करत आहेत.

या वेब सीरिजच्या माध्यमातून घरासाठी संघर्ष करणाऱ्या मध्यवर्गीय कुटुंबाची गोष्ट मांडली जाणार आहे. मुंबईतील ‘कॅम्पा कोला’ इमारतीचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. इमारत अनधिकृत असून ती पाडण्याचा आदेश न्यायालायने दिला होता. त्यानंतर नागरिकांनी त्याविरोधात लढा पुकारला होता. नेमकी हीच गोष्ट या वेब सीरिजमध्ये सांगितली जाणार आहे.

वेब सीरिजमध्ये भ्रष्ट बांधकाम व्यवसायिक तसंच न्यायव्यवस्थेसोबतचा लढा दाखवला जाणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये सुप्रिया पिळगावकर यांच्यासहित अन्नू कपूर, अमोल पराशर आणि परीक्षित साहनी मुख्य भुमिकेत आहेत. हबीब फैसल यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं असून ‘इशकजादे’, ‘दो दुनी चार’ आणि ‘दावत ए इश्क’ यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता डिजीटल विश्वात ते आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 7:54 pm

Web Title: alt balaji launch new web series home
Next Stories
1 सुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर
2 एन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा
3 काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट
Just Now!
X