News Flash

दिवसाआड लसीकरण

वसई-विरारमध्ये खासगी रुग्णालयांत ठणठणाट

वसई-विरारमध्ये खासगी रुग्णालयांत ठणठणाट; दिलेली लसीकरणाची परवानगी थांबवली

वसई : वसई-विरार शहरातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. दुसरीकडे लशींचा तुटवडा असल्याने पालिकेने खासगी रुग्णालयांना लसीकरणाची दिलेली परवानगी तूर्तास थांबवली आहे.   परवानगी दिलेल्या रुग्णालयात लशींचा ठणठणात आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य केंद्रात  दिवसाआड लसीकरण केले जाणार आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढू लागला आहे. नागरिक करोनाची लस घेण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र पालिकेकडे लशींचा तुटवडा असल्याने पालिकेने एक दिवसाआड लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणासाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी विरार पूर्वेकडील चंदनसार, रानळे तलाव, नारींगी, विरार पश्चिमेकडील निदान, बोळींज, नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव, धानीव, नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क, वसई पूर्वेकडील वालीव, वसई पश्चिमेकडील दिवाणमान, नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये  लसीकरण सुविधा देण्यात येणार आहे. वसईमधील डीएमपेटीट रुग्णालय, बोळींज येथील अलगीकरण केंद्र आणि नालासोपारामधील तुळींज रुग्णालयात रविवार वगळता ६ दिवस लसीकरण केले जाईल. शहरातील १० खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे. आणखी १० रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्याने त्यांना देण्यात आलेली परवानगी तूर्तास थांबविण्यात आली आहे., अशी मागणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) संतोष देहेरकर यांनी दिली.

एक दिवसाआड केले जाणारे लसीकरण केंद्रे

(सोमवार, बुधवार, शुक्रवार )

दररोज ४०० जणांच्या चाचण्या

दरम्यान पालिकेने ४०० चाचण्या केल्या जात असून करोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण ११ टक्के एवढे आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी देखील कमी झाला आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सदर रुग्णांच्या सेवेसाठी वसई पुर्वेच्या वालीव येथील वरुण इंडस्ट्रीज कोव्हीड केयर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले असून तेथील सुरु असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद करण्यात आले आहे.

विरार

* चंदनसार,

* रानळे तलाव,

* नारींगी,

* निदान,

* बोळींज

नालासोपारा

* मोरेगाव

* धानीव

* पाटणकर पार्क,

* वालीव,

* दिवाणमान,

* नायगाव

* जुचंद्र नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

सोमवार ते शनिवार  केले जाणारे लसीकरण केंद्रे

* वसई पश्चिम मेकडील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वसई (डी.एम.पेटीट रुग्णालय)

* तुळींज रुग्णालय, नालासोपारा पूर्व,

* बोळींज अलगीकरण केंद्र, विरार पश्चिम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:17 am

Web Title: alternate day vaccination in vasai virar municipal health centers zws 70
Next Stories
1 सलमान खानने घेतली करोना लस; पात्रतेसंबंधी नेटकऱ्यांना पडला प्रश्न
2 सलमानची भाची अलीजे करणार सनी देओलच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये एण्ट्री
3 सलमान खान पोहोचला लिलावती रुग्णालयात, जाणून घ्या कारण
Just Now!
X