News Flash

‘मी टू’ नंतर आता ‘सेक्स स्ट्राइक’ चळवळ

जगभरामध्ये अनेक देशांमध्ये गर्भपाताविषयक कायदे अत्यंत कडक केले आहेत

‘मी टू’ नंतर आता ‘सेक्स स्ट्राइक’ चळवळ

जगभरामध्ये ‘मी टू’ चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री एलिसा मिलानो हिने आता महिलांसाठी एक नवीन चळवळ सुरु केली आहे. एलिसाने महिलांना ‘सेक्स स्टाइक’ करण्याचं आवाहन केलं आहे. गर्भपातविषयक कायदे बदलण्याच्या मागणीसाठी तिने महिलांना एकत्र येत ‘सेक्स स्ट्राइक’चा मार्ग अवलंबण्याचं आवाहन केलं आहे. तिने एक ट्विट करत महिलांना हे आवाहन केलं आहे.

“आपल्या शरीरावर केवळ आपलाच अधिकार आहे, हे सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे. आम्ही आमच्या शरीरावर प्रेम करतो आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षदेखील करू शकतो. त्यामुळे सत्ताधारी पुरुषांना तुमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका, असं टविट एलिसाने केलं असून तिने महिलांना पुढाकार घ्यायला सांगितला आहे.

महिलेचा तिच्या शरीरावर पूर्ण अधिकार असतो हे पटवून देण्यासाठी तिने ‘सेक्स स्टाइक’चा पर्याय सुचवला आहे. जोपर्यंत जगभरातील महिलांना त्यांच्या शरीरावर पूर्ण अधिकार प्राप्त होत नाही, तोपर्यंत महिलांनी आपल्या पार्टनरसोबक शारीरिक संबंध ठेवू नयेत अर्थात सेक्स स्टाइक करावा, असं तिने सांगितलं आहे.

जगभरामध्ये अनेक देशांमध्ये गर्भपाताविषयक कायदे अत्यंत कडक केले आहेत. त्यामुळे अनेक वेळा महिलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यासाठी या कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणी सध्या जगभरामध्ये जोर धरत आहे. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये नुकतेच गर्भपात कायद्यात काही बदल करण्यात आले. हार्टबील कायद्यानुसार, भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागल्यानंतर महिला गर्भपात करू शकणार नाही असं ठरवण्यात आलं. ६ आठवड्यात भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ऐकू यायला लागतात, मात्र अनेक वेळा ६ आठवडे झाल्यानंतरही महिला गरोदर असल्याचं तिच्या लक्षात येत नाही त्यामुळे हा कायदा महिलांसाठी जाचक असून त्यात बदल करण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 11:30 am

Web Title: alyssa milano sex strike now
Next Stories
1 गोडसेबाबत ‘त्या’ वक्तव्यामुळे कमल हासन यांना जीवे मारण्याची धमकी
2 हॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डॉरिस डे यांचे निधन
3 या तारखेपासून सुरू होतेय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा
Just Now!
X