वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपट नुकताच अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. गेलं वर्षभर या चित्रपटाची चर्चा होती. मात्र नामांकित स्टार कास्ट असतानाही हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. किंबहूना बॉलिवूडच्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक फ्लॉप चित्रपटांमध्ये याची गणना केली जात आहे. काही नेटकऱ्यांनी तर ‘कुली नंबर १’ सोबतच अ‍ॅमेझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील ट्रोल केलं. परिणामी संतापलेल्या मॅनेजमेंटनं या चित्रपटाचे हक्क कोणाच्या सांगण्यावरुन खरेदी केले? याची चौकशी आता सुरु झाली आहे.

अवश्य पाहा – सौंदर्याची मल्लिका…; पाहा अभिनेत्रीचा बिकिनी अवतार

अ‍ॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडिच्या कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. परंतु गेल्या काही काळात फ्लॉप बॉलिवूड चित्रपटांमुळे अ‍ॅमेझॉन प्राईमची लोकप्रियता हळहळू कमी होऊ लागली आहे. त्यातच कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी ‘दुर्गामती’ आणि ‘कुली नंबर १’ या चित्रपटांचे हक्क कोट्यवधी रुपयांना खरेदी केले.

अवश्य पाहा – सलमानमुळेच ‘या’ अभिनेत्रींना करता आलं बॉलिवूडमध्ये पादार्पण

लक्षवेधी बाब म्हणजे हे दोन्ही चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. प्रेक्षक अक्षरश: या चित्रपटांची खिल्ली उडवत आहे. शिवाय चित्रपटांचे हक्क खरेदी करताना एकदा तरी तुम्ही ते पाहाता का? असा सवाल अ‍ॅमेझॉन प्राईमला विचारला जात आहे. परिणामी वेबसाईटच्या मुख्य कार्यालयातील संतापलेल्या अधिकाऱ्यांनी या नव्या करारांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार अशा फ्लॉप चित्रपटांचे हक्क यापुढे अ‍ॅमेझॉन खरेदी करणार नाही. या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला उत्तम कॉन्टेट पाहायला मिळेल याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन अ‍ॅमेझॉन प्राईमच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे.