अॅमेझॉन प्राइम हे व्हिडियोजसाठी सध्या गाजत असलेले माध्यम आहे. लवकरच यावर एक नवीन सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ असे या सिरीजचे नाव असून हा शो चार तरुण, शहरी भारतीय महिलांच्‍या जीवनावर प्रकाश टाकतो. आपल्‍या पसंतीने जगणा-या व प्रेम करणा-या तरुण पिढीला शिकवण देतो. पहिल्‍याच पर्वामध्‍ये ही १०-एपिसोड असलेली कॉमेडी, ड्रामा व रोमांसपूर्ण सिरीज चार महिलांमधील अतुट नाते दाखवते. ही सिरीज त्‍यांचे नाते, कामातील संघर्ष, आकांक्षा आणि चिंता यांच्‍याभोवती फिरते. या महिला आपले जीवन पूर्णपणे जगतात, प्रेम करतात आणि २०१८ मधील भारतीय महिला असण्‍याच्‍या संघर्षाचा सामना करतात.

या सिरीजमध्‍ये अन्‍याय किंवा नैतिक धडे यांचा समावेश असण्‍यासोबतच आपल्‍या महिलांना वाचवण्‍यासाठी कोणताच पुरुष पुढे सरसावत नाही या बाबीला दाखवण्‍यात आले आहे. प्राइम ओरि‍जनल सिरीज २०० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍यांसाठी २५ जानेवारी २०१९ रोजी उपलब्‍ध होईल. रंगिता प्रितिश नंदी निर्मित, प्रितिश नंदी कम्‍युनिकेशन्‍सची निर्मिती आणि अनु मेनन यांचे दिग्‍दर्शन असलेला हा शो प्रामुख्‍याने महिलावर्गाला केंद्रस्थानी ठेऊन साकारण्यात आला आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे संचालक व कन्‍टेन्‍ट प्रमुख विजय सुब्रमण्‍यम म्‍हणाले, ”आम्‍हाला चार शहरी भारतीय महिला, त्‍यांच्‍या जीवनातील निवडी, त्‍यांचे संघर्ष, रोमांस, उच्‍च गुण, भक्‍कम व जीवनदायी मैत्रीची महिलाकेंद्री कथा ‘फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ सादर करताना खूप आनंद होत आहे. आम्‍ही कलाकारांपासून टीमपर्यंत प्रबळ, महिलाकेंद्री समूहासह काम केले आहे. ‘फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ ही सिरीज मन, तन आणि विचारांनी स्‍वतंत्र असलेल्‍या भारतीय महिलांच्‍या विचारांना सादर करते. ही कथा भारतात अजूनपर्यंत सादर करण्‍यात आलेली नाही.

प्रितिश नंदी कम्‍युनिकेशन्‍सचे अध्‍यक्ष प्रितिश नंदी म्‍हणाले, ”’फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ ही आपल्‍या काळासाठी आमची मानवंदना आहे. यात चार मैत्रिणी एकमेकींसोबत खूप मजा करतात, आपले यश, प्रसंगी प्रेमामधील विघ्‍ने, सहनशक्‍ती आणि आनंद शेअर करतात. ही मजेशीर, रोमांचक व जादुई सिरीज हास्‍य, विनोदाने भरलेली आहे आणि स्‍वत:ला कधीच गृहीत न मानणा-या पिढीमधील अंतरंगांना दाखवते.

देविका भगतचे लेखन, इशिता मोएत्राचे संवाद असलेली ‘फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ सिरीज चार विभिन्‍न महिलांच्‍या जीवनाभोवती फिरते. या चार महिला त्‍यांच्‍या वैयक्तिक संघर्षांसोबतच जीवनात येणा-या इतर समस्‍यांचा देखील सामना करतात. कधीच न थांबणारे शहर मुंबईच्‍या दक्षिण भागातील या चार मैत्रिणी दर काही दिवसांनी एकत्र येतात आणि त्‍यांच्‍या आवडत्‍या गॅरेज बारमध्‍ये मद्यपान करत मद्यधुंद होतात. ‘फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ सिरीज लाखो शहरी भारतीय महिलांचा दृष्टिकोन, जीवन, त्‍यांच्‍याबाबतीत असलेल्‍या क्रूर वास्‍तवाला सादर करते. आजच्‍या भारतीय महिलांना परंपरा व आधुनिक जीवनाचा सामना करावा लागतो. त्‍यांना विचारशील महिला, मुक्‍त असावेसे वाटते. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ढोंगीपणा अधिक असलेल्‍या या देशामध्‍ये हे अशक्‍य आहे.

या प्राइम ओरिजनल सिरीजमध्‍ये चार महिलांची भूमिका साकारत आहेत सयानी गुप्‍ता, किर्ती कुल्‍हारी, बानी जे आणि मानवी गगरू. तसेच सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकारांचा देखील समावेश आहे जसे प्रतिक बब्‍बर, नील भूपलालम, लिसा रे, मिलिंद सोमण, अमृता पुरी आणि सपना पब्‍बी. पॉप संस्‍कृतीला दाखवणारी ‘फोर मोर शॉट्स प्‍लीज!’ सिरीज आधुनिक भारतीय महिलेच्‍या विचारांना सादर करते. हा शो २५ जानेवारी २०१९ रोजी प्राइम व्हिडिओवर उपलब्‍ध असेल.