काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. अक्षय कुमारचं प्रोडक्शन हाउस केप ऑफ गुड फिल्म्स, एबंडेंशिया इंटरटेनमेंट, लायका प्रोडक्शंस याच्यासोबतच आता अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ देखील या सिनेमाची सहनिर्मिती करणार आहे.

या सिनेमातून खोलवर रुजलेली भारतीय संस्कृतीची मुळं आणि ऐतिहासिक वारसा समोर आणला जाणार आहे. हा सिनेमा अ‍ॅक्शन ऍडव्हेंचर ड्रामा असून या सिनेमात अक्षय कुमार सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा असे दमदार कलाकार असणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर ‘राम सेतू’ भारतातील तसंच 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील प्राइम मेंबर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिनेता अक्षय कुमार म्हणाला, “राम सेतूच्या कथेने मला नेहमीच अचंबित केलंय, प्रेरणा दिली आहे. राम सेतू हा भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील पिढ्यांमधील दुवा आहे.”

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाचे कंटेंट विभागाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले, “अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओमध्ये प्रत्येक निर्णयात आम्ही प्रेक्षकांची पसंती लक्षात घेतो. भारतीय मातीशी नाळ जोडलेल्या कथा नेहमी फक्त भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि आपल्या भारतीय वारशावर प्रकाश टाकणाऱ्या सिनेमासोबत जोडले जाण्यासाठी आम्ही सहनिर्मितीत पाऊट टाकल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या प्रेक्षकांचे यापुढेही मनोरंजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”