News Flash

अभिनेत्रीने केला घटस्फोटित पतीवर हल्ला; क्लिप व्हायरल…

अभिनेत्रीचे आरोप ठरले खोठे

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. मात्र कोर्टात हे आरोप पुराव्यांअभावी खोटे ठरले. उलटपक्षी तिनेच जॉनीवर हल्ला केला होता, असे एका ऑडिओ क्लिपवरुन सिद्ध झाले आहे.

डेलीमेल या वेबसाईटने एक ऑडिओ क्लिप प्रदर्शित केली आहे. यात जॉनी व अ‍ॅम्बरमध्ये झालेल्या भांडणाचे रेकॉर्डिंग आहे. ही क्लिप तीन वर्षांपूर्वीची आहे. अ‍ॅम्बरने जॉनीवर हल्ला केला होता. असे या क्लिपमध्ये तिच्याच तोंडून ऐकू येत आहे.

दरम्यान ही क्लिप किती खरी वा किती खोटी याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र ही क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जॉनीच्या चाहत्यांनी या क्लिपच्या जोरावर ‘जस्टिस फॉर जॉनी डेप’ असे हॅशटॅग वापरुन त्याला सोशल मीडियाव्दारे पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

२०१६ साली अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप विवाहबद्ध झाले होते. परंतु पुढे अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचा संसार मोडीस निघाला. गेली तीन वर्ष दोघे एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. सर्वप्रथम अ‍ॅम्बरने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत ५० लाख अमेरिकी डॉलरचा दावा ठोकला होता. परंतु पुराव्यांअभावी तिचे दावे खोटे ठरले. त्यानंतर जॉनीने तिच्या मानहानिचा दावा ठोकला. हे प्रकरण गेली तीन वर्ष कोर्टात सुरु आहे. व्हायरल झालेल्या या नव्या ऑडियो क्लिपमुळे या वादाला आता आणखी एक नवे वळण मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 6:37 pm

Web Title: amber heard admits hitting johnny depp mppg 94
Next Stories
1 एका लग्नाची चौथी गोष्ट; १२ व्या दिवशी झाला घटस्फोट
2 रसिकाच्या बोल्ड फोटोंवर अमेय वाघची अतरंगी कॉमेंट
3 ‘थप्पड’ मारणाऱ्या पतीविरोधात महिला करणार तक्रार
Just Now!
X