17 July 2019

News Flash

अ‍ॅम्बर हर्डचे दावे फोल, जॉनी डेपचा प्रतिहल्ला

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वोमॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे.

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वोमॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर मानसिक व शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळेच दोघांनी घटस्फोट घेतला होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले; परंतु अ‍ॅम्बरला जॉनीविरोधात सबळ पुरावे सादर करता आले नाही. परिणामी त्याला निदरेष मुक्त करण्यात आले. आता हे प्रकरण एवढय़ावरच थांबेल अशी अपेक्षा होती, परंतु या वादाने वेगळेच वळण घेतले आहे. आता जॉनीनेच आपल्या घटस्फोटित पत्नीवर मानसिक व शारिरीक अत्याचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप तो गेली दोन वर्ष करत होता. मात्र यावेळी त्याने अ‍ॅम्बरविरोधात पुरावे सादर केले आहेत.

‘माझी पत्नी नाइट पब व पाटर्य़ामध्ये दारू पिऊ न धुमाकूळ घालायची. याशिवाय तिला अंमली पदार्थाचेही व्यसन होते. मी तिला अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु ती माझ्याबरोबर वाद घालायची. अनेकदा मद्यधुंद अवस्थेत असताना तिने मला हातात लागेल त्या वस्तूने मारले आहे. तिच्या या व्यसनी प्रवृत्तीमुळेच माझी सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात होती.’ असे आरोप जॉनीने कोर्टात केले आहेत. शिवाय त्याच्या वकिलांनी हे आरोप सिद्ध करणारे काही पुरावेदेखील सादर केले आहेत.

जेव्हा या प्रकरणाची सुरुवात झाली तेव्हा असेच काहीसे पुरावे अ‍ॅम्बरने देखील सादर केले होते. परंतु पुढे ते पुरावे खोटे असल्याचे सिद्ध झाले. यानंतर आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जॉनीने अ‍ॅम्बरवर तब्बल ३४७ कोटी रुपयांचा दावा ठोकला होता. सध्या हे प्रकरण ज्या दिशेने जात आहे. त्या अनुषंगाने पाहता अ‍ॅम्बर हर्डवरील आरोप सिद्ध होतील अशी चर्चा आहे.

२०१६ साली अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप विवाहबद्ध झाले होते. परंतु पुढे अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचा संसार मोडीस निघाला. गेली दोन वर्ष दोघे एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. या वादाचे पहिले तीन अंक समाप्त झाले असून जॉनीने सादर केलेल्या पुराव्यामुळे आता चौथ्या अंकाचा प्रारंभ झाला आहे.

First Published on June 15, 2019 11:37 pm

Web Title: amber heard johnny depp mpg 94