News Flash

‘जॉनी डेपने माझ्या वडिलांना दिली ठार मारण्याची धमकी’; अभिनेत्रीने केला आरोप

"जॉनीने माझ्या वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता."

हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर मानसिक व शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळेच दोघांनी घटस्फोट घेतला होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले; परंतु अ‍ॅम्बरला जॉनीविरोधात सबळ पुरावे सादर करता आले नाही. परिणामी त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. आता हे प्रकरण एवढय़ावरच थांबेल अशी अपेक्षा होती. परंतु या वादाने वेगळेच वळण घेतले आहे. अ‍ॅम्बरने जॉनीवर आता आणखी एक गंभीर आरोप केला आहे. “जॉनीने माझ्या वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.” असा खळबळजनक आरोप अ‍ॅम्बरने केला आहे.

 

View this post on Instagram

 

Because it’s the weekend and if you’re not rolling around in bed in satin with roses then drop your phone and get to it.

A post shared by Amber Heard (@amberheard) on

काय म्हणाली अ‍ॅम्बर हर्ड ?

अ‍ॅम्बरचे वडिल डेव्हिड हर्ड सुट्टीच्या दिवशी घरात आराम करत होते. त्यावेळी जॉनी दारुच्या नशेत कुठलीही कल्पना न देता त्यांच्या घरी गेला. व त्याने थेट पिस्तुल काढून डेव्हिड यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना आणखी घाबरवण्यासाठी त्याने एक गोळी देखील झाडली होती असा आरोप अ‍ॅम्बरने केला आहे. परंतु हा आरोप सिद्ध करण्यासाठी तिने अद्याप कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. तसेच या नव्या आरोपांवर जॉनीने देखील कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

२०१६ साली अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप विवाहबद्ध झाले होते. परंतु पुढे अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचा संसार मोडीस निघाला. गेली तीन वर्ष दोघे एकमेकांविरोधात सातत्याने आरोप करत आहेत. परंतु दोघांनीही एकमेकांविरोधात अद्याप कुठलेही पुरावे सादर केलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:16 pm

Web Title: amber heards father accused of threatening to shoot johnny depp mppg 94
Next Stories
1 Video : “हे होतं आमचं अखेरचं बोलणं”, दीपिकाने केला श्रीदेवींच्या ‘त्या’ मेसेजचा खुलासा
2 मुलांना ओळख मिळावी म्हणून केलं लग्न – अर्चना पुरण सिंग
3 रितेशवर कर्जाचे आरोप करणाऱ्यांनी मागितली माफी
Just Now!
X