28 September 2020

News Flash

सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला धमकीचे फोन?

फोन करुन 'ते' करतात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

(सुशांत सिंह राजपूतचं संग्रहित छायाचित्र)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. त्यातच सध्या सुशांतचं मृतदेह घेऊन जाणारा रुग्णवाहिका चालक चर्चेत आला आहे. सुशांतचे चाहते त्याला धमकीचे फोन करत असल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. ही रुग्णवाहिका विशाल बंदगार चालवत होते. परंतु, रुग्णवाहिकेमध्येच सुशांतचा गळा आवळून त्याचा खून केल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या हे काही चाहते विशाल बंदगारला सतत फोन करुन धमकी देत आहेत. इतकंच नाही तर दिवसातून असे धमकीचे अनेक फोन येत असून ते अर्वाच्च भाषेत बोलतात असंही, विशालने सांगितलं आहे.

मी आणि माझा भाऊ शहरातील अनेक रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. परंतु, मी सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन गेलो तेव्हापासून आज एक महिना झाला, मला सतत धमकीचे फोन येत आहेत, असं विशाल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, बऱ्याच वेळा हे चाहते अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. तसंच रुग्णालयात नेतांना सुशांत जीवंत होता, मात्र रुग्णवाहिकेत त्याचा गळा आवळा गेला त्यामुळे तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल असंही चाहते म्हणतात.

दरम्यान, विशाल यांचा चार रुग्णवाहिका असून त्यावर लिहिण्यात आलेल्या फोन नंबरवर देशातील विविध भागातून धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे अखेर विशाल यांनी पोलीस तक्रार करण्याचा विचार करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:42 am

Web Title: ambulance driver carrying dead body of sushant singh rajput claims fans threatening on phone calls ssj 93
Next Stories
1 मिस इंडिया फाइनलिस्ट मॉडेलने UPSC परिक्षेत मारली बाजी; पटकावला ९३ वा क्रमांक
2 सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयच्या हाती; केंद्राकडून अधिकृत सूचना
3 ‘जग किती सुंदर आहे’ म्हणत सुनील शेट्टीने शेअर केला सायकल चालवतानाचा व्हिडीओ
Just Now!
X