राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेलने चित्रपटसृष्टीतून फारकत घेतली आहे. मात्र चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये अमिषा बिंधास्त आणि बोल्ड अंदाजात दिसत असली तरी नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
ट्विटर असो किंवा इन्स्टाग्राम अमिषाचा वावर या ठिकाणी कायमच असतो. सतत कोणत्याकोणत्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. त्यामुळे यावेळी तिने एक हॉट फोटोशूट केल्याचं पाहायला मिळालं. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टावर शेअर केले. मात्र नेटकऱ्यांनी तिला तिच्या वाढत्या वयाची आठवण करून देत तिला ट्रोल केलं.
The long and short of it … pic.twitter.com/gDiAVTO54z
— ameesha patel (@ameesha_patel) August 16, 2018
अमिषा ४३ वर्षाची असल्यामुळे तिने हे फोटोशूट करताना विचार करायला हवा होता असा सल्ला काही नेटकऱ्यांनी तिला दिला. तर काहींनी तिला लग्न करण्याचाही सल्ला दिला. त्यामुळे अमिषाचं हे हॉट फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीत न उतरल्याचं दिसून आलं.
Left or right ?? Which do u prefer ??? I’m confused pic.twitter.com/PepG1zuqA2
— ameesha patel (@ameesha_patel) August 20, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 1:26 pm