फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटाने अनेक अभिनेत्री चमकतात. पण याच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींची पाऊले कधी कोणत्या दिशेने वळतील याचा नेम नसतो. असेच काहीसे एका हॉलिवूड अभिनेत्रीसोबत झाले आहे. या अभिनेत्रीने तर चक्क तिची पाऊले पॉर्न इंडस्ट्रीकडे वळवली आहेत. खुद्द या अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

९० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘बॉय मीट्स वर्ल्ड’ या हॉलिवूड टीव्ही सीरिजमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मॅटलेंड वार्ड. मॅटलेंडने तिच्या अभिनयाच्या जोरावर ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. नुकताच या अभिनेत्रीचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. मॅटलेंड वार्डने अभिनय क्षेत्राबरोबरच आता पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. या इंडस्ट्रीमध्ये तिला रिशेल मॅक्गवायर या नावाने ओळखले जाते. खुद्द मॅटलेंडने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Karan Sharma Ties Knot With actress Pooja Singh
Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

मॅटलेंडने वयाच्या १६ व्या वर्षी, १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बोल्ड अँड ब्यूटीफुल’ या मालिकेतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘वार्डने यूएसए हाय’, ‘रूल्स ऑफ एन्गेजमेन्ट’ आणि ‘होम इम्प्रूवमेन्ट’च्या सातव्या पर्वामध्ये काम केले. मालिकांनंतर मॅटलेंडला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किलिंग मिस्टर ग्रिफिन’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात मॅटलेंडसोबत अभिनेता मारियो लोपेज मुख्य भूमिकेत होता.

त्यानंतर मॅटलेंडने १९९८ मध्ये ‘बॉय मीट्स वर्ल्ड’ मध्ये काम केले. या शो मधून मॅटलेंड खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. तिने अनेकांच्या मनात घर केले. त्यानंतर तिने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका विनोदीपटामध्ये काम केले.

मॅटलेंडला एका मुलाखतीमध्ये पॉर्न इंडस्ट्रीकडे वळण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने पहिल्या अडल्ट चित्रपटात काम करणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. मॅडलेंडने पहिले चित्रपटाची कथा वाचली त्यानंतर चित्रपटातील भूमिकेसाठी होकार कळवला होता. तसेच चित्रपटातील मॅटलेंडची भूमिका ही सुंदर लिहिण्यात आली असल्याचे देखील तिने सांगितले.