News Flash

करोनाच्या कचाट्यात आणखी एक हॉलिवूड अभिनेत्री; शेअर केला अनुभव

आतापर्यंत अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे

जगात करोनाचा प्रादुर्भाव थांबावा म्हणून प्रत्येक देश योग्य ती काळजी आणि उपाययोजना करत आहेत. मात्र तरीदेखील करोनाचा फैलाव होताना दिसत आहे. आतापर्यंत जगात अनेक जणांना करोनाची लागण झाली आहे. यात काही बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनाही लागण झाल्याचं समोर येतं आहे. बॉलिवूडमध्ये गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली असून हॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे आता या यादीत आणखी एका हॉलिवूड अभिनेत्रीची करोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याचं स्पष्ट झालं आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

हॉलिवूडमधील इंदरीस एल्बा या सेलिब्रिटींना करोनाची लागणी झाली आहे. तर गायिका एडम स्लेसिंगर हिचं निधन झालं आहे. यामध्येच आता अभिनेत्री अली वेंटवर्थ हिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली.
माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

‘आतापर्यंत कधीच इतकी आजारी पडले नव्हते. माझ्या अंगात खूप ताप आहे, सगळ्या शरीरात प्रचंड वेदना होतायेत. अंग दुखतंय. मी माझ्या कुटुंबापासून लांब आहे. सध्या क्वारंटाइनमध्ये राहतीये’, अशी पोस्ट अलीने लिहिली असून सोबत स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बेडवर झोपलेली दिसत आहे.

दरम्यान, तिची पोस्ट पाहिल्यानंतर कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. आतापर्यंत हॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. यात इदरीस एल्बा, ओलिविया निकेंकेन यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 8:26 am

Web Title: american actress ali wentworth also got positive corona test ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video : लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या रितेशला जेनेलियाने घासायला लावली भांडी
2 सध्याच्या स्थितीत हे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच : आदिनाथ कोठारे
3 Video : द ग्रेट खलीला आव्हान देणाऱ्या तरुणाची झाली अशी अवस्था
Just Now!
X