News Flash

अमेरिकी महिलेकडून प्रियांका चोप्राचा अपमान, पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

बॉलिवूडनंतर संपूर्ण जगभरात आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. कधी या देसी गर्लच्या ड्रेसची चर्चा सुरु असते तर कधी निकसोबत शेअर केलेल्या फोटोंची. कोणत्या ना कोणता कारणाने ही देसी गर्ल चर्चेत असतेच. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने अमेरिकन चाहते हे भारतीय चाहत्यांपेक्षा जास्त सभ्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे प्रियांकावर टीका केली. मुलाखतीमधील या वक्तव्यानंतर काही दिवसांमध्येच अमेरिकेतील एका महिलेने प्रियांकाचा अपमान करत व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रियांकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेचे नाव धालिवाल असून तिने ट्विटरद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला मॅगझिन कचऱ्याच्या डब्यात फेकताना दिसत आहे. या मॅगझिनवर प्रियांकाचा फोटो आहे. ‘आज माझ्या घरी हे मॅगझिन आले. मी विचार केला, ते रिसायकलिंग करण्याऐवजी फेकुन दिले तर जास्त चांगले होईल’ असे कॅप्शन त्या महिलेने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

याआधी ही प्रियांकाला अमेरिकन चाहत्यांनी ट्रोल केले होते. प्रियांकाने निकवर लग्नासाठी दबाव टाकल्याचे वृत्तदेखील एका मॅगझिनने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित केले होते. तर दुसरीकडे एका मॅगझिनने ते दोघे विभक्त होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. मात्र प्रियांका आणि निकच्या कुटुंबीयांनी या सर्व अफवा असल्याचे सांगता चर्चांना पूर्णविराम लावला होता. दरम्यान अशा चर्चा कायम राहिल्या तर त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करु असे देखील त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:30 pm

Web Title: american women insult priyanka chopra by throwing his magazine in dustbin avb 95
Next Stories
1 विभक्त झाल्यानंतरही दिया मिर्झा आणि पती साहिल संघा दिसले एकत्र
2 …म्हणून रानू मंडल यांची मुलगी १० वर्षांनंतर परतली
3 मालिकांमध्येही मोरया मोरया!
Just Now!
X