05 June 2020

News Flash

करोनाने घेतला आणखी एका कलाकाराचा बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

करोनामुळे ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाचा मृत्यू

करोना विषाणूने संपूर्ण जगात सध्या थैमान घातले आहे. या प्राणघातक व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत आता आणखी एका कलाकाराचे नाव जोडले गेले आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध गायक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते जॉन प्राइन यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ते ७३ वर्षांचे होते.

जॉन प्राइन खरं तर न्यूमोनियामुळे आजारी होते. परंतु मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वँडरबिल्ट युनिव्हरसिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांचं शरीर या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर १३ दिवसांच्या प्रतिकारानंतर आठ मार्चला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जॉन प्राइन अमेरिकेतील आघाडिचे गायक व संगीतकार होते. सॅम स्टोन, हॅलो इन देअर, ऑल द बेस्ट, पॅराडाईस यांसारख्या शेकडो सुपरहिट गाण्यांची निर्मिती त्यांनी केली आहे. १९९१ आणि २००५ साली त्यांना ‘सर्वोत्कृष्ट कंटेंपररी फोक’ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते. २०१९ मध्ये त्यांना ‘द रेकॉर्डिंग’ अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. गेल्या वर्षी त्यांनी फुप्फुसांची शस्त्रक्रिया केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 5:14 pm

Web Title: americas greatest songwriters john prine dead due to coronavirus mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये दारु न मिळाल्याने अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या ?
2 मालिकेतील वादग्रस्त कथानकामुळे उजळलं अभिनेत्रीचं नशीब
3 Photo : नेहा पेंडसेच्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X