News Flash

“लस घेतली आणि फोटो टाकला नाही की…”; अमेय वाघचं भन्नाट कॅप्शन

लस घेतल्याचा फोटो केला शेअर

सध्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे करोना लसीचा पहिला डोस घेतानाचे फोटो चांगलेच व्हायरल होतं आहेत. करोना प्रतिबंधात्मक लस घेताना हे कलाकार नागरिकांनादेखील लस घेण्याचं आवाहन करत आहेत. अभिनेत्रीा अंकिता लोखंडे, जेनेलिया आणि रितेश देशमुुख यांनी करोनाची लस घेतली आहे.

नुकताच मराठमोळा अभिनेता अमेय वाघनेदेखील करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या अमेयने लसीकरणाचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. अमेय वाघ त्याच्या विनोदी शैलीसाठी खास ओळखला जातो. हटके व्हिडीओ आणि तितकच हटके कॅप्शन देऊन तो चाहत्याचं लक्ष वेधून घेत असतो.

लस घेतल्याचा फोटो शेअर करतानाही अमेयने भन्नाट कॅप्शन दिलंय. “लस घेतली आणि फोटो टाकला नाही की अ‍ँटीबॉडीज रुसतात म्हणे.” असं म्हणते त्याने या सेवेसाठी पुणे महानगरपालिकेचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by amey wagh (@ameyzone)

अमेयच्या या कॅप्शनवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शवली आहे. अभिनेत्री शिवानी बोरकरने “अरे अरे” असं म्हंटलंय. तर अभिनेता हेमंत ढोमेने टाळ्यांचे इमोजी देत अमेयचं कौतुक केलंय. अभिनेत्री वैदही परशुरामीने देखील हसण्याचे इमोजी कमेंट बॉक्समध्ये दिले आहेत.

वाचा: सलमान खानच्या पोस्टवर संगीता बिजलानीची कमेंट; चाहते म्हणाले “भाभीजान”

अमेय लवकरच ‘झोंबीवली’ या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहे. मराठीतील हा पहिला झोंबी सिनेमा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 4:52 pm

Web Title: amey wagh got vaccinated and share photo with hilarious caption goes viral kpw 89
Next Stories
1 आईच्या आठवणीत सोनू सूदने शेअर केली पोस्ट, व्हिडीओ पाहून चाहते भावून
2 ‘रक्तदान करताना मास्क लावण्याची परवानगी नाही’, ट्रोल करणाऱ्यांना सोनू निगमचे उत्तर
3 दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X