News Flash

अमेय म्हणतोय.. ‘मी ‘गर्लफ्रेंड’ पटवणार’

सोशल मीडियावर अमेयच्या 'गर्लफ्रेंड'चीच चर्चा

अमेय वाघ

हल्ली कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला आपली एक गर्लफ्रेंड असावी असे वाटते. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे ही गोष्ट अलीकडे अत्यंत सामान्य झाली आहे. मात्र एखाद्याला गर्लफ्रेंड नसेल तर त्याची ग्रुपमध्ये खिल्ली उडवली जाते. अशा अनेक घटना असतात. अशीच काही अवस्था ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ याची झाली आहे. आणि तो म्हणतोय …मी ‘गर्लफ्रेंड’ पटवणार.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये आजच्या एका मुलाची कथा मांडणार आहे. पोस्टर नंतर आता ‘गर्लफ्रेंड’चा टीजर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. ‘जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!’, त्यानंतर ‘दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा!’ अशी पोस्ट अमेयने लिहिल्यानंतर याची बरीच चर्चा झाली.

नचिकेताला कुठे एखादं जोडपं दिसलं, तर त्याच्या अंगी निराशेची लहर संचार करते, त्यातून तो ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय करतो असं या टीजरमध्ये पाहायला मिळतंय. आता नचिकेतला गर्लफ्रेंड मिळणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 4:06 pm

Web Title: amey wagh upcoming marathi movie girlfriend teaser released
Next Stories
1 बोल्ड सीनदरम्यान प्रकाश झा यांची टिप्पणी खटकली – अहाना कुमरा
2 रात्रीस खेळ चाले २ : सेटवर ‘वच्छी’ला वाटते या गोष्टीची भीती
3 तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वाद: लैंगिक छळाप्रकरणी साक्षीदारांना घटनाक्रमच आठवेना
Just Now!
X