News Flash

“2020-लॉकडाउन इन डोंबिवली, 2021-अनलॉक इन झोंबिवली” असे का म्हणतोय अमेय वाघ

जाणून घ्या कारण

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अमेय वाघच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे.

अमेयने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने ‘२०२० – लॉकडाउन इन डोंबिवली, २०२१ – अनलॉक इन झोंबिवली’ असे म्हटले आहे. तसेच चित्रपटाच्या पोस्टरमध्ये झोंबी असल्याचे देखील दिसत आहे. एक वेगळा विषय या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याचे पोस्टर पाहून वाटत आहे.

अमेयचा ‘झोंबिवली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशूरामी आणि ललित प्रभाकर हे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे. हा मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात पहिला झोंबी हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:58 pm

Web Title: amey wagh upcoming movie jhombivli first poster avb 95
Next Stories
1 उर्वशी रौतेला लॉकडाउनमध्ये खेळतेय क्रिकेट; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 ‘अमिताभ रुग्णालयात, आता तू तुझं पोट कसं भरणार?’, ट्रोलरला अभिषेकने दिले सणसणीत प्रत्युत्तर
3 ‘या’ दिग्दर्शकांचे काम आवडते- अक्षय इंडीकर
Just Now!
X