चीनच्या वुहान शहरातून जगभरात फैलावलेल्या करोना विषाणूमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण आहे. घराबाहेर पडल्यावर या विषाणूची लागण होईल या भीतीने नागरिक घरातून बाहेर पडण्यास घाबरतं आहेत. तर विदेशात वास्तव्यास असलेले नागरिक परत मायदेशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील हिच परिस्थिती असून करोना विषाणूची लागण झालेले काही रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर काहींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याचा निर्णय सोनम कपूरने घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सोनमने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.
काही दिवसापूर्वी सोनम पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये गेली होती. मात्र करोना विषाणूचं सावट सर्वत्र असल्यामुळे तिने परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. केवळ इतकंच नाही तर भारतात आल्यानंतर तिने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. एक व्हिडीओ शेअर करत सोनमने ही माहिती दिली.
View this post on Instagram
Stay safe guys @sonamkapoor . . . #sonamkapoor // #corona #coronavirus #covid_19
“मी माझ्या पतीसोबत भारतात परत येण्यासाठी रवाना झाले आहे. आता अजून काळ घरापासून दूर राहू शकत नाही. लव्ह यू ऑल”, अशी एक पोस्ट सोनमने केली होती. त्यानंतर देशात पोहोचल्यानंतर तिने देशात करोना विषाणूपासून वाचण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचं कौतूकही केलं.
मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोनम आणि तिच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोनमने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे तिच्या अन्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सोनमने हा निर्णय घेतला आहे.
वाचा :‘मुगल ए आझम’चा या भाषेतही केला होता रिमेक,पण…
दरम्यान, करोना विषाणूमुळे नागरिकांमधील भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाळा, कॉलेज, मॉल अशी गर्दीची ठिकाणं काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 11:52 am