News Flash

“तू तर आमिर खानचा मुलगा आहेस ना?”; नेटकऱ्याच्या प्रश्नावर आयराचं सडेतोड उत्तर

लाईव्ह सेशनमध्ये नेटकऱ्याचा सवाल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असते. अनेकदा आयराला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. मात्र नेटकऱ्यांची बोलती कशी बंद करायची हे आयराला चांगलच ठाऊक आहे. नुकत्याच आयराने घेतलेल्या एका सेशनमध्ये तिला एका नेटकऱ्यानी विचित्र प्रश्न विचारला. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर आयराने सडेतोड उत्तर दिलंय.

आयरा अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेटकऱ्यांशी संवाद साधत असते. मानसिक आरोग्यासाठी ती जनजागृतीचं काम करते. यासंदर्भातील अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. सोमवारी आयराने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन घेतलं. यात तिने मला स्वत:बद्दल काय करावं हे सुचत नाहीय असा सवाल करत तुम्हाला काही माहित आहे का? असा सवाल केला होता.

आयराने उपस्थित केलेल्या या मुद्द्यवर एक नेटकरी तिला म्हणाला, “तू तर आमिर खान सरांचा मुलगा आहेस ना?”. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर लगेचच आयराने त्याला उत्तर दिलंय. ती म्हणाली, ” नाही मी त्यांची मुलगी आहे. पण हे जेंडर नाउन्स कशाला आहेत ? असं म्हणत लैंगिंक भेदभाव करणाऱ्या या नेटकऱ्याला आयराने उत्तर दिलंय.

ira-amir-khan

 

आयरा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिक्रेला डेट करतेय. यावरूनच या सेशनमध्ये एका युजरने तिला तुला मराठी येते का असा प्रश्न विचारला होता. यावर “नाही..पण मी समजू शकते” असं आयराने मराठीत उत्तर दिलंय.

आयरा खान आमिर खानची मुलगी असली तरी तिला अभिनया क्षेत्रात येण्याची इच्छा नाही. हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आयरा म्हणाली होती, “मला पडद्यामागे राहून काम करायला जास्त आवडतं. मला अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा नाही. मात्र एखादा अॅक्शन सिनेमा असेल तर मी तो नक्की करेल कारण त्यामुळे मला सर्व स्टंट शिकायला मिळतील. तसं तरी मी सिनेमा न करता ही स्टंट शिकू शकते नाही का?” असं म्हणत आयरा बॉलिवूडमध्ये तिला येण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:11 pm

Web Title: amir khan daughter ira slam back who aksed her you are amir khans son kpw 89
Next Stories
1 साखरपुडा मोडून १७ वर्ष झाली, तरी ‘ही’ अभिनेत्री घालते तिच अंगठी
2 जेव्हा सैफ करीना कपूरला म्हणायचा ‘मॅम’; “मीच पुढाकार घेतला” करीनाचा खुलासा
3 प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये झळकणार सिद्धार्थ शुक्ला; ‘ही’ महत्वाची भूमिका साकारणार
Just Now!
X