News Flash

…..म्हणून आमिरने लावला ‘महाभारत’ला ब्रेक!

भूमिकेसाठी केली होती दोन वर्षे मेहनत....

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान.

अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. कारण तो त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो आणि त्याचं काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भूमिकेच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे तो लक्ष देत असतो. ती भूमिका जास्तीत जास्त जिवंत करण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या काही महिन्यापासून आमिर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

महाभारत या त्याच्या नव्या चित्रपटाबद्दलची ही चर्चा आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरने या चित्रपटासाठी जवळपास दोन वर्ष खूप मेहनत घेतली. पण आता हा मात्र त्याने या चित्रपटासंदर्भातलं काम सध्या बाजूला ठेवलं आहे.

बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, याचं काम थांबवण्यामागे फक्त आर्थिक कारण नाही तर अजूनही काही आहे.

बॉलिवूड हंगामा त्या रिपोर्टमध्ये सांगत आहे की, आमिर आपल्या आयुष्यातली २ वर्षे एका वेबसीरीजसाठी देऊ इच्छित नाही. त्याला अशा चित्रपटाचा भाग व्हायचं आहे, ज्याचं दिग्दर्शन कोणत्या तरी विश्वासार्ह दिग्दर्शकाचं असेल. महाभारत बनवण्यासाठी ही वेळ योग्य नाही. महाभारतासारखी दीर्घ कथा एका चित्रपटाद्वारे मांडणं अवघड आहे, म्हणून निर्मात्यांनी ही कथा वेबसीरीजच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:19 pm

Web Title: amir khan puts mahabharat on hold vsk 98
Next Stories
1 ‘फिल्मफेअरची ही ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात’- महेश कोठारे
2 ‘तांडव’ प्रकरणी अ‍ॅमेझॉन प्राईमने मागितली माफी; “प्रेक्षकांच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता”
3 Birthday Special: ‘विनोदाच्या बादशहा’चे खरे नाव माहिती आहे का?
Just Now!
X