16 November 2019

News Flash

आमिरच्या मुलीने केला तिच्या नात्याचा खुलासा

इराच्या वक्तव्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होत्या. आत खुद्द इरानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे वक्तव्य कले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

इराने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me anything’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. संवादामध्ये एका चाहत्याने इराला ‘ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर इराने तिचा आणि संगीतकार मिशाल कृपलानीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये इराने मिशालला मीठी मारल्याचे दिसत आहे. तसेच इराने तिच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मिशालला टॅग देखील केले आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

यापूर्वीही मिशाल आणि इराचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. त्यातील इराच्या वाढदिवसाची पोस्ट व्हायरल झालेली दिसलती होती. या पोस्टमध्ये मिशालने इरासाठी अत्यंत सुंदर संदेश लिहिला होता. त्या संदेशमध्ये ‘तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला तुझ्यासोबत नेटफ्लिक्सवरील सर्व चित्रपट आणि सीरिझ पाहायचे आहेत’ असे लिहिले होते. त्याच्या या संदेशाने अनेकांची मने जिंकली होती.

First Published on June 13, 2019 9:24 am

Web Title: amir khans daughter ira khan speaks about her relationship avb 95