आमिर आणि त्याची मुले इरा आणि जुनैद खान यांचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण असं काय आहे या फोटोंमध्ये की जे पाहून नेटकरी चकीत झाले आहेत?

या फोटोंची चर्चा होण्याचं कारण म्हणजे आमिरचा मोठा मुलगा जुनैद याच्यात झालेले बदल. जुनैदने आपलं वजन इतकं कमी केलं आहे की तो आता ओळखूही येत नाही. नेटकऱ्यांनी त्याच्यातला हा बदल टिपला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)


जुनैदने आपल्या वजनासोबत आपली दाढीही कमी केली आहे. या व्हिडिओमध्ये तो क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसत आहे. आमिरचा यावेळचा लूकही त्याच्या चाहत्यांना पसंत पडला आहे. मुंबईमध्यला एका रेस्तराँच्या बाहेर हे तिघे दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


जुनैद लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित महाराजा या चित्रपटात तो दिसणार आहे. यात जुनैदसोबत शालिनी पांडे, शर्वरी वाघ, जयदीप अहलावत हे कलाकारही दिसणार आहेत. यात चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका न्यायालयीन खटल्याबद्दल हा सिनेमा असेल.
तर आमिर खान नुकताच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला, ज्यात तो एली अवरामसोबत हरफनमौला या गाण्यावर डान्स करत होता. आमिर सध्या त्याच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर त्याच्यासोबत दिसणार आहे.