26 February 2021

News Flash

तारक मेहता मधल्या बाबुजींचा स्वॅग पाहिलात का??

सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे देशभरात अनेक चाहते आहेत. १० वर्षांपेक्षा जास्त काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. जेठालाल, दयाबेन, टप्पू, भिडे, सोधी, बबिता, अय्यर ही सर्व पात्र अनेक भारतीयांना जवळची झाली आहेत. गेल्या काही महिन्यांत करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात मालिकांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. याचा फटका तारक मेहता मालिकेलाही बसला. परंतू सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा या मालिकेचे नवीन भाग चित्रीत व्हायला सुरुवात झाली आहे.

मालिकेत जेठालालचे वडील म्हणजेच बाबुजींची भूमिका साकारणाऱ्या अमित भट या कालाकाराने सोशल मीडियावर आपला एक बाईकवर बसलेला फोटो पोस्ट केला आहे. मालिकेत अमित भट जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या वडिलांची भूमिका करत असले तरीही प्रत्यक्ष आयुष्यात ते दिलीप यांच्यापेक्षा लहान आहेत. बाबुजींच्या या फोटोला चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.

मालिकेत बाबुजी हे पात्र जुन्या विचारांचं पण तितकच मजेशीर दाखवण्यात आलेलं आहे. जेठालाल आणि बाबुजी यांच्यात होणाऱ्या गमतीजमतीच्या प्रसंगांचे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झालेले पहायला मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 2:23 pm

Web Title: amit bhat aka babuji character in tmkoc share his cool picture on bike on social media psd 91
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे
2 आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर सर्च केली ‘या’ धक्कादायक गोष्टींविषयी माहिती
3 सुशांत मृत्यू प्रकरण : अमृता फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाल्या…
Just Now!
X