News Flash

सुशांत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शाह यांनी दिलं उत्तर

पप्पु यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात केला खळबळजनक दावा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, बिहारमधील माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे,” असं पप्पु यादव यांनी म्हटलं. तसंच त्यांच्या हत्येची CBI चौकशी करावी अशी विनंती त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना केली होती. त्यांच्या या विनंतीचा स्विकार करत अमित शाह यांनी त्यांना पत्र पाठवलं आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

अवश्य पाहा – …जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…

अमित शाह यांनी पप्पु यादव यांच्या विनंतीवर प्रतिक्रिया देण्यासाठी एक पत्र पाठवलं आहे. या पत्राचा फोटो पप्पु यादव यांनी ट्विट केला आहे. “पप्पू यादव आपण पाठवलेलं पत्र १६ जून २०२० रोजी मिळालं. आपण अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची विनंती केली आहे. तुमच्या पत्राचा विषय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे ते पत्र संबंधित मंत्रायलाकडे पाठवण्यात येत आहे.” असं उत्तर अमित शाह यांनी पत्रातून दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील वांद्रेमध्ये असलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येनं सगळ्यानाच धक्का बसला. त्याचबरोबर त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नसलं, तरी अनेक तर्क लावले जात आहे. दरम्यान, बिहारमधील माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मोठं विधान केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 4:13 pm

Web Title: amit shah home ministry reply on sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अभिनेत्री अर्चना निपाणकर विवाहबद्ध
2 डायना पेंटीने दीपिकासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणते…
3 “जगाचा अंत होत आला तरी बिग बॉसमध्ये जाणार नाही”; अभिनेत्याने चर्चांवर दिला पूर्णविराम
Just Now!
X