‘बकेट लिस्ट’ या पहिल्याच मराठी चित्रपटाचे यश, खूप वर्षांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पडद्यवर पाहणारम्य़ा चाहत्यांनी तिच्यावर केलेला प्रेमाचा, कौतुकाचा वर्षांव या सगळ्यात आनंदाने न्हाऊन निघणारी माधुरी दीक्षित सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. खुद्द अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिची भेट घेतल्यानंतर तर तिच्या राजकारण प्रवेशाबद्दलच्या चर्चा अधिकच रंगू लागल्या. तिला राज्यसभेची ऑफर दिली गेल्याचेही बोलले जाते आहे. मात्र या सगळ्याला फारसे महत्व न देता आपल्याला राजकारणात अजिबात रस नसल्याचे तिने स्पष्ट केले. मी कलाकार आहे आणि कलाकारच राहणार, असं ती ठामपणे सांगते.

‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाचं यश आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे असं सांगणारी माधुरी सध्या खूप खूश आहे. या चित्रपटातून जो एक संदेश द्ययचा आमचा प्रय होता तो लोकांपर्यंत अचूक पोहोचला आहे त्यामुळेच चित्रपट लोकांना आवडला आणि अजूनही चित्रपटगृहातून ‘बकेट लिस्ट’ पहायला लोक गर्दी करतायेत, याबद्दल आपण खूप आनंदी आणि समाधानी असल्याचं तिने सांगितलं. तुम्ही तुमचं आयुष्य भरभरून जगलं पाहिजे. नोकरी—व्यवसाय, मुलंबाळं—संसार या सगळ्या गोष्टी असणारच आणि त्या जबाबदारम्य़ा नीट पूर्णपणे पार पाडल्याही पाहिजेत मात्र हे करत असताना सगळ्या व्यापातून स्वत:साठी थोडा वेळ काढलाच पाहिजे, स्वत:साठी जगायला शिकलं पाहिजे, हेच या चित्रपटातून मांडलं होतं. हा विचार लोकांनाही आवडला असून त्यांनीही तो उचलून धरला आहे, असं ती सांगते. ‘बकेट लिस्ट’ला जो प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे फक्त तिचे चाहतेच भारावून गेले आहेत असं नाही. तर तिच्या घरचेही तिच्यावर खूश आहेत. माझा नवरा आणि माझी मुलं सगळ्यांना हा चित्रपट आवडला. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे यात काहीतरी शिकवणूक देतोय असा पवित्रा अजिबात घेतलेला नाही. उलट हसतखेळत, गाणी गात मनोरंजक पध्दतीनेच तो विषय लोकांपर्यंत पोहोचवला आहे, असं ती म्हणते.

एक चित्रपच हिट झाला की आपोआप सगळी बिघडलेली गणितं जुळून यायला लागतात. ‘बकेट लिस्ट’च्या यशाचा फायदा माधुरीच्या आगामी चित्रपटांना होऊ शकतो हे तिलाही माहिती असलं तरी मार्केटची गणितं आणि प्रेक्षकांची पसंती हे समीकरण गेली अनेक वर्ष तिने पाहिलेलं असल्याने याबाबतीत ती खूप सावधपणाने भूमिका घेते. मराठीत १५ ऑगस्ट नावाच्या चित्रपटाची ती निर्मिती करते आहे. हाही चित्रपट कौटूंबिक आणि निखळ मनोरंजन करणारा आहे. ‘बकेट लिस्ट’मुळे प्रेक्षक माझ्या दुसरम्य़ा चित्रपटाला प्राधान्य देतीलही, त्याचा फायदाही होईल पण मुळात चित्रपटही तितकाच चांगला व्हायला हवा. तेव्हाच तो लोकांना आवडेल, असं ती स्पष्ट करते. अभिनेत्री म्हणून तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिट झाला कारण तो लहान मुलांपासून आजी—आजोबांपर्यंत सगळ्यांनाच एकत्र पाहता आला, असं तिला वाटतं.

सध्या तिच्याकडे जे जे चित्रपट आहेत ते कमालीचे आहेत, असं ती म्हणते. ‘टोटल धम्माल’मध्ये खूप सारे कलाकार आहेत पण तरी तिथे माझी पूर्णपणे विनोदी अशी भूमिका आहे त्यामुळे काम करतानाही धम्माल येतेय. तीच गोष्ट ‘कलंक’ची. इथेही खूप कलाकार आहेत पण जॉनर वेगळा आहे आणि करण जोहरचा चित्रपट असल्याने तोही वेगळा अनुभव ठरतो आहे, असं माधुरी म्हणते. या सगळ्या धबडग्यात ती तिचं नृत्यप्रेम अजिबात विसरलेली नाही. ‘डान्स विथ माधुरी’ ही तिची ऑनलाईन प्रशिक्षण संस्था सुरू आहे. पण आपल्याकडे इंटरनेट जोडणीच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत. म्हणून मग टाटा स्काय, डीटीएच, व्हिडिओकॉन यांच्या मदतीने नृत्याचे हे क्लासेस घरोघरी पोहोचले आहेत. या क्लासेसच्या मदतीने तुम्ही शाष्टद्धr(२२९ीय नृत्य, बॉलीवूड नृत्य, लोकनृत्य, पाष्टिद्धr(१५५)मात्य नृत्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही घरबसल्या शिकू शकता. सध्या आम्हाला ३०६ देशांमधून याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असं तिने सांगितलं. वेबसीरीज हे नवीन माध्यम असल्याने तिथेही काही वेगळं आणि दर्जेदार काम करता आलं तर त्याचीही तयारी आहे असं म्हणणारी माधुरी चाहत्यांच्या प्रेमाचा विषय निघाला की थोडी भावूक होते. गेले ३४ वर्ष मी या इंडस्ट्रीत आहे. इतकी वर्ष लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे आणि आजही ते तितकंच प्रेम करतायेत, यापेक्षा आणखी मोठं काय असू शकतं असं म्हणणारी माधुरी सध्या तरी या प्रेमात चिंब भिजली आहे, यात शंका नाही.

बकेट लिस्टमध्ये राजकारण..

‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाबरोबर सगळीकडे माधुरीच्या नावाची एकच हवा झाली आहे. अगदी मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर तर तिची राजकीय इच्छांची बकेटही पूर्ण होईल, असं म्हटलं जातंय. पण आपल्याला कुठल्याच प्रकारची राजकीय कारकिर्द करण्याची इच्छा नसल्याचं ती सांगते. ती भेट सरकारी कार्यRमांतर्गत होती. त्यांच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानासाठी ते विविध लोकांना भेटी देतायेत. त्यात एक नाव माझंही होतं इतकंच. मी हाडाची कलाकार आहे आणि मला शेवटपर्यंत कलाकार म्हणूनच काम करायचं आहे, असं तिने सांगितलं.