News Flash

५० लाख रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

जाणून घ्या काय होता प्रश्न..

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आणि आमिताभ बच्चन यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना विशेष आवडतात. गुरुवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये निलेश गिरकर हे हॉट सीटवर बसले होते. पण ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. तुम्ही देऊ शकाल का प्रश्नाचे उत्तर?

निलेश हे कौन बनेगा करोडपतीमध्ये हॉट सीटवर बसले होते. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर २५ लाख रुपये जिंकले. पण ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांच्या चारही लाइफलाइन संपल्या होता.

५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न-
१९६२मधील आशियाई खेळांमध्ये फुटबॉल खेळाच्या अंतिम सामन्यात भारतातील कोणत्या दोन खेळाडूंनी गोल केला होता, ज्यामुळे भारताला सुवर्ण पदक मिळाले?

A. पी के बॅनर्जी, जरनल सिंह
B. नेविल डिसूजा, तुलसीदास बलराम
C. चुन्नी गोस्वामी, यूसुफ खान
D. सैय्यद नईमुद्दीन, अरुण घोष

५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नासाठी हे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर पी के बॅनर्जी, जरनल सिंह असे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:44 pm

Web Title: amitabh bacchan kaun banega crorepati contestant quit 50 lakh question avb 95
Next Stories
1 Birthday Special: नम्रता शिरोडकरने ‘या’ कारणासाठी सोडले होते फिल्मी करिअर
2 म्हणून प्रियांका अमेरिकेतून पळून आली होती भारतात
3 ‘बंगबंधू’ चरित्रपटाच्या चित्रिकरणाला मुंबईत सुरुवात
Just Now!
X