29 October 2020

News Flash

‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील बीग बिंचा ‘कूल लूक’ ; पाहा KBC 12चा प्रमो

लवकरच केबीसी १२ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमिताभ बच्चन

मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणार शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी).’ या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन करत असून शो नेहमीच चर्चेत असतो. अमिताभ बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे शोचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण करोनावर मात करुन बिग बींनी पुन्हा चित्रीकरणास सुरुवात केली. तसेच केबीसी १२चा नुकताच प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत ‘जो अभी हो, सेटबॅक का जवाब कमबॅकसे दो’ असे म्हटले आहे. तसेच लवकरच कौन बनेगा करोडपती पर्व १२ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे म्हटले आहे.

‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ केबीसीच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होते. मात्र टाळेबंदीत चित्रीकरणच ठप्प झाल्याने हा शोही रखडला होता. त्यातल्या त्यात घरातूनच चित्रीकरण पूर्ण करत शोचे प्रोमोज तयार करण्यात आले होते. सगळ्या प्रकारची काळजी घेऊन ते चित्रीकरण करण्यात आले होते. आता शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘के बीसी १२’ या शोबरोबरच रणबीर कपूर आणि अलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही अमिताभ यांची महत्त्वाची भूमिका आहे. याही चित्रपटाचे चित्रीकरण बाकी असून ऑक्टोबर महिन्यात चित्रीकरण पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. तसेच नागराज मंजुळे यांच्या ‘झूंड’ या चित्रपटातही बिग बी दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण केव्हा सुरु होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 9:19 am

Web Title: amitabh bachan kaun banega crorepati 12 promo avb 95
Next Stories
1 रियाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी
2 ‘दररोज प्रेक्षकांना हसवणे आव्हानात्मक’
3 चकमकींमागचे चेहरे
Just Now!
X