News Flash

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो

हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सध्या बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आगामी चित्रपट ‘चेहरे’ आणि ‘गुलाबो सिताबो’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. ‘चेहरे’ चित्रपटातील १४ मिनिटांचा संवाद वनटेकमध्ये दिल्यामुळे अमिताभ यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील त्यांचा लूक लोकप्रिय ठरला आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या अमिताभ यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमिताभ यांनी त्याच्या ट्विटर खात्यावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ यांच्या कुटुंबातील तिन पिढ्यांचा समावेश असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांचे आजोबा, अमिताभ स्वत: आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी पगडी घातली असल्याचे दिसत आहे. ‘माझे आजोबा… नाना.. दारजी.. सरदार खजान सिंह सूरीआणि माझा मुलगा’ असे फोटो शेअर करत लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर खाते हॉक झाले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरून अमिताभ बच्चन यांचा फोटो काढून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्यांच्या प्रोफाईलवर लव पाकिस्तान असा संदेशही लिहिण्यात आला होता. अय्यिलिदीज तिम तुर्कीश सायबर आर्मीने त्यांचे अकाऊंट हॅक केल्याचे समोर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 5:36 pm

Web Title: amitabh bachan share photo of grandfather and son avb 95
Next Stories
1 शनाया करते ‘या’ अभिनेत्याला डेट, पण लग्नाबद्दल म्हणते…
2 ‘कबीर सिंग’ ठरतोय सुपरहिट! तिसऱ्याच दिवशी गाठला ५० कोटींचा पल्ला
3 भारत नव्हे, तर ‘या’ चित्रपटातील भूमिका सलमानसाठी आव्हानात्मक
Just Now!
X