05 March 2021

News Flash

बिग बींच्या नातीने वाढदिवशी गायलं भजन; हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

बिग बींच्या नातीनं वाढदिवशी गायलं 'जय सिया राम भजन'

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लाडकी मुलगी आराध्या हिचा आज वाढदिवस आहे. आराध्या आज आपल्या ९ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील हजारो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान आराध्याने भगवान श्री राम यांची प्रार्थना करुन आज आपल्या दिवसाची सुरुवात केली. तिने श्री राम यांचं एक भजन गायलं आहे. या भजनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आराध्या ही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आहे. अमताभ यांच्या फॅन पेजवरुन आराध्याचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये ती जय सिया राम हे भजन गाताना दिसत आहेत. आराध्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी आराध्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. देशभरात सध्या करोनामय वातावरण आहे. देशभरातील जनता करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर बच्चन कुटुंबीय आराध्याचा वाढदिवस नेहमीप्रमाणे मोठ्या थाटामाटात साजरा करणार नाही. उलट गरजवंतांना मदत करुन ते वाढदिवस सादरा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 2:04 pm

Web Title: amitabh bachchan aaradhya bachchan jai siya ram bhajan viral video mppg 94
Next Stories
1 जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता गं तुला, अभिनेत्री कमल ठोके यांच्या निधनानंतर ‘अज्या’ ची भावनिक पोस्ट
2 …म्हणून मामा-भाच्याच्या नात्यात आला दुरावा; कृष्णानं केली भांडण संपवण्याची विनंती
3 ‘ढिल्या कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत’; करिश्माने घटस्फोटित पतीवर केला आरोप
Just Now!
X