News Flash

लंडनला एकत्र फिरायला जाण्यासाठी अमिताभ-जया यांनी घेतला होता लग्नाचा निर्णय

जाणून घ्या जया-अमिताभ बच्चन यांची लव्हस्टोरी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा कलाविश्वामध्ये चांगलाच दबदबा आहे. त्यांची लोकप्रियता कमालीची आहे. अनेक कलाकरांची बिग बींसोबत काम करण्याची इच्छा असते. विशेष म्हणजे कलाविश्वामध्ये नाव कमावूनही बिग बी प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागतात. बिग बी जितका आदर त्यांच्या चाहत्यांना किंवा चित्रपटाच्या सेटवर देतात तितकाच आदर ते आपल्या कुटुंबीयांनादेखील देतात. अमिताभ यांनी ३ जून १९७३ साली अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत लग्न केले. पण त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला याचा खुलासा एका कार्यक्रमात केला होता.

अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या एका खास भागात लग्नाचा किस्सा सांगितला होता. त्यांच्या लग्नाची ही सहजसाधी गोष्ट ऐकताना अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जया आणि अमिताभ यांनी ‘जंजीर’ चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपट हिट ठरल्यानंतर त्यांनी लंडनला फिरायला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण जाण्यापूर्वी वडिलांनी जया यांच्याशी लग्न करुन फिरायला जाण्याची अट घातली. वडिलांची आज्ञा प्रमाण मानून दुसऱ्याच दिवशी बिग बींनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा : मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘सेलिब्रिटी सिस्टर्स’, जाणून घ्या ‘या’ सख्या बहिणींविषयी

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

”मी आणि जया त्यावेळी जंजीर चित्रपटात एकत्र काम करत होतो. त्यावर्षी चित्रपट हिट झाला तर परदेशात फिरायला जाण्याचा बेत आम्ही आखला होता. मी लंडन कधीच पाहिले नव्हते आणि जयानेही पाहिले नव्हते. त्यामुळे जंजीर हिट झाला तर लंडनला फिरायला जाण्याचे आम्ही निश्चित केले. त्यानंतर मी माझ्या वडिलांना मित्रांबरोबर लंडनला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर मी लंडनला कसा जाणार, कोणाकोणाबरोबर जाणार, असे प्रश्न त्यांनी विचारले. मित्रमैत्रिणींच्या यादीत जयाचे नाव ऐकल्यावर त्यांनी जायचे असेल तर विवाह करून जा, असे सांगितले आणि वडिलांची आज्ञा प्रमाण मानून दुसऱ्याच दिवशी लग्नाचा निर्णय घेत आम्ही लंडन गाठले”, असा किस्सा अमिताभ यांनी ऐकवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 11:23 am

Web Title: amitabh bachchan and jaya bachchan love story avb 95
Next Stories
1 “भयानक डान्सर आहे”, नव्या डान्स व्हिडीओमुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंह पुन्हा ट्रोल
2 गायिका नीति मोहनने दिला मुलाला जन्म, पती निहार पांड्याने सोशल मीडियावरुन दिली माहिती
3 “टॉपलेस फोटोशूटमुळे मला भूमिका मिळतील असं नाही”; रायमा सेनने सांगितलं ‘त्या’ फोटोशूटचं कारण
Just Now!
X