07 December 2019

News Flash

‘गोल्डन गर्ल’ हिमा दासला बॉलिवूडचाही सलाम, शुभेच्छा देताना सेलिब्रिटी म्हणतात…

हिमा दासने केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाच वातावरण आहे

भारताची वेगवान धावपटू हिमा दास सध्या उत्तम कामगिरी करत आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने ४०० मी. शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. गेल्या १९-२० कालावधीतलं हिमाचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. हिमा दासने केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाच वातावरण असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे राहिलेले नाहीत. अमिताभ बच्चनपासून ते तापसी तन्नूपर्यंत अनेक कलाकारांनी हिमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

“अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन…जय हिंद..आम्हां साऱ्यांना तुमचा खूप अभिमान आहे हिमा दास, तुम्ही भारताचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं आहे”, असं ट्विट करुन अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं.


तर “हिमा दास ५ सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही आसामसाठी केलेलं काम आमच्यासाठी एक प्रकारची प्रेरणा आहे. एक महान एथलीट ज्यांच्याजवळ सोन्यासारखं हृदय आहे. तुम्हाला अशीच उतरोत्तर प्रगती करावी यासाठी मनापासून प्रार्थना. भारत देशाला तुमचा अभिमान आहे”, असं अनिल कपूर म्हणाला.

“हिमा दास केवळ १५ दिवसांमध्ये सलग चार वेळा सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मनापासून अभिनंदन. आम्हा सगळ्यांना गर्व वाटेल अशी कामगिरी तुम्ही केली आहे, अशीच प्रेरणा साऱ्यांना देत रहा, जय हिंद”, असं विवेक ओबेरॉय म्हणाला.

First Published on July 22, 2019 9:53 am

Web Title: amitabh bachchan anil kapoor and these bollywood cele congratulations to hima das for winning the 5th gold ssj 93
Just Now!
X