05 August 2020

News Flash

KBC 11: शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल बिग बींनी मागितली माफी

सोनी वाहिनीकडून जाहिररित्या माफी मागण्यात आल्यानंतर आता बिग बींनीही ट्विट केले.

अमिताभ बच्चन

‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे. कार्यक्रमात स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होता. यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. या चुकीबद्दल सोनी वाहिनीकडून जाहीररित्या माफी मागण्यात आल्यानंतर आता बिग बींनीही ट्विट करत माफी मागितली आहे.

”शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू मुळीच नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो”, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय. गुजरातच्या शाहेदा चंद्रन या ‘केबीसी’च्या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.
१. महाराणा प्रताप
२. राणा सांगा
३. महाराजा रणजीत सिंह
४. शिवाजी

यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने चाहत्यांनी नाजारी व्यक्त केली. सोशल मीडियावरील रोषानंतर सोनी वाहिनीकडून माफी मागण्यात आली. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अनवधानाने आमच्याकडून बुधवारच्या भागामध्ये एक चूक झाली. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेता यासंदर्भातील आम्ही कालच्या (गुरुवारच्या) भागादरम्यान माफी मागण्यासंदर्भातील स्क्रोल चालवला होता,” असं ट्विट ‘सोनी वाहिनी’च्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 3:56 pm

Web Title: amitabh bachchan apologises for disrespecting shivaji maharaj in kbc ssv 92
Next Stories
1 Video : धवनची ‘गब्बर’ अ‍ॅक्टिंग.. केली अक्षय कुमारच्या ‘बाला’ची नक्कल
2 महाराजांचा सिंह तानाजी नव्हे तान्हाजीच!
3 चित्र रंजन : वास्तवाची ‘कॉपी’
Just Now!
X