24 October 2020

News Flash

कोट्यवधी कमावणाऱ्या बिग बींना पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळालं होतं?

बिग बींना आज बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण झाली आहेत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही रुपेरी पडद्यावरील अमिताभ यांच्या भूमिकेपुढे कलाकार फिके पडतात. त्यांच्या पहिल्याच चित्रपटानंतर ते बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवरणार असे म्हटले जात होते. मात्र पहिला चित्रपट मिळवणे हे अमिताभ यांच्यासाठी फार कठिण होते.

अमिताभ यांना करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांना त्यांच्या उंचीमुळे आणि दिसण्यामुळे अनेक चित्रपटांसाठी नाकार मिळाला होता. पण अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांचा बिग बींवर पूर्ण विश्वास होता. ते सतत बिग बींचे वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो काढत असत. एक दिवस रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अजिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटासाठी दिग्दर्शक ख्वाजा अहमद हे पुरुष कालाकाराच्या शोधात असल्याचे समजले. अजिताभ यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना बिग बींचा फोटो दाखवला आणि अशा प्रकारे अमिताभ यांना पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ हा मिळाला.

आणखी वाचा : मी फक्त शरद पवारांविषयी बोललो नव्हतो- जितेंद्र जोशी

‘सात हिंदुस्तानी’ या पहिल्यावहिल्या चित्रपटात अमिताभ यांनी कवी अनवरची भूमिका वटवली होती. चित्रपट दिग्दर्शकांनी अमिताभ यांची निवड केली तेव्हा त्यांना अमिताभ हे हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र असल्याचे माहिती नव्हते. या चित्रपटासाठी अमिताभ यांना ५००० रुपये मानधन मिळाले होते. चित्रपटातील अमिताभ यांच्या भूमिकेसाठी कौतुक करण्यात आले. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. आज या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

आणखी वाचा : बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री लवकरच चढणार बोहल्यावर

त्यानंतर अमिताभ यांनी १९७१ मध्ये ‘आनंद’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने अमिताभ यांना लोकप्रियता मिळवून दिले असे म्हटले जाते. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटासाठी अमिताभ यांना फिल्म फेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर हा अवॉर्ड मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:33 pm

Web Title: amitabh bachchan as debut movie saat hindustani turns 50 avb 95
Next Stories
1 ‘बाहुबली २’ चित्रपटासाठी अनुष्काने घेतले होते इतके मानधन
2 ‘या’ कारणामुळे सारिकाशी केले होते कमल हासनने लग्न
3 रणवीर सिंगच्या त्या ट्विटला नागपूर पोलिसांनी दिले ‘खतरनाक’ उत्तर
Just Now!
X