News Flash

अमिताभ यांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या दिग्दर्शकाला दिलं आव्हान

बिग बी म्हणाले हिंमत असेल तर हे करुन दाखव...

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते फोटो, व्हिडीओ आणि कवितांच्या माध्यमातून समाजातील विविध घडामोडींवर नेहमीच भाष्य करतात. यावेळी अमिताभ दिग्दर्शक अयान मुखर्जीला दिलेल्या आव्हानामुळे चर्चेत आहेत.

अयान मुखर्जीचा ‘ब्रम्हास्त्र’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटावरुनच अमिताभ यांनी अयानला आव्हान दिले आहे.

काय म्हणाले अमिताभ?

अमिताभ म्हणाले, “ब्रम्हास्त्र या वर्षी चार डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता अयान मुखर्जीला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची परवानगी नाही.” चित्रपट ठरलेल्याच दिवशी प्रदर्शीत करण्याचे आव्हान बिग बींनी आपल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिले आहे.

ब्रम्हास्त्र हा चित्रपट यापूर्वी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही आर्थिक अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबवण्यात आली. या चित्रपटात बिग बींसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकही आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:22 pm

Web Title: amitabh bachchan ayan mukerji brahmastra alia bhatt ranbir kapoor mppg 94
Next Stories
1 सुबोध भावेचा ‘विजेता’ लवकरच पडद्यावर; पोस्टर रिलीज
2 इतिहासाचे रिमिक्स..
3 लुकलूकत्या गोष्टी : ‘हा ड्रेस मला खूप आवडला’
Just Now!
X