30 October 2020

News Flash

#Happy Birthday Amitabh Bachchan : कलाविश्वातून बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतनेही बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील अॅग्री यंग मॅन अशी ओळख मिळविलेल्या अमिताभ बच्चन यांनी आज ७६ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसून येत आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

भोजपुरी चित्रपटातील अमिताभ बच्चन अशी ओळख असलेल्या रवी किशन याने ट्विटरच्या माध्यमातून बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी त्याने एका चित्रपटातील पोस्टरदेखील शेअर केलं आहे. तर अभिनेता परेल रावल यांनीदेखील अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतनेही बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या चित्रपटांचे पोस्टर शेअर केले आहेत.

शाहरुख खानच्या फॅन क्लबवरुन बिग बींना अनोख्या अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या आहे. अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य गाजविणाऱ्या बिग बींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तर दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार धनुषनेही ट्विटरवरुन बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

रणबीर कपूर, रजनीकांत, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर या दिग्गजांनीदेखील बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 9:41 am

Web Title: amitabh bachchan birthday wish to bollywood celebrities
Next Stories
1 #MeToo : सुहेल सेठवरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप
2 #Happy Birthday Amitabh Bachchan: ‘बिग बीं’चं खरं नाव माहित आहे का ?
3 #MeToo : नाना पाटेकरांसह चार जणांवर गुन्हा दाखल
Just Now!
X