बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. चाहत्यांना खुश करण्यासाठी अमिताभ यांनी अलिकडेच एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

अमिताभ यांनी “सांगा पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक कोणाला मिळाले पाहिजे?” अशी कॉमेंट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका धावण्याच्या शर्यतीतील आहे. या शर्यतीत पहिल्या क्रमांवर पळत असलेल्या धावपटूचे चित्रिकरण केले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चित्रिकरण करणारा कॅमेरामॅन त्या धावपटूच्या पुढे पळत आहे. अमिताभ यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत ४० हजार पेक्षा अधिक लोकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

याआधी अमिताभ देशातील मोबाईल नेटवर्कमुळे चर्चेत होते. त्यांनी भारतातील मोबाईल नेटवर्कची खिल्ली उडवणारे ट्विट केले होते. “माझ्या बालपणी 3G, 4G, 5G नव्हते. फक्त गुरुजी, पिताजी आणि माताजी होते. फक्त एक थोबाडीत मारली की आमचे नेटवर्क यायचे.” असे ट्विट बिग बींनी केले होते.

देशात सध्या 3G आणि 4G नेटवर्क मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. हे आजवरचे सर्वात वेगवान नेटवर्क समजले जाते. परंतु अधिक पैसे भरुनही मोबाईलवर बोलताना अचानक संभाषण तुटणे (कॉल ड्रॉप), नेटवर्क नसणे, सिग्नल बूस्टर वापरुनही इंटरनेटचा वेग स्थिर नसणे यांसारख्या समस्यांना देशातील मोबाईल ग्राहक सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमिवर अमिताभ यांनी केलेले ट्विट देशातील मोबाईल नेटवर्कबाबत चिंता व्यक्त करणारे आहे, असे म्हटले जात होते.