बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध पोस्ट, फोटो, ब्लॉग्स आणि व्हिडीओजच्या माध्यामातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी देखील त्यांनी अशीच एक गंमतीशीर पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही.
असं काय पोस्ट केलं आहे बिग बींनी?
अमिताभ बच्चन यांनी स्वत:चे कार्टून अवतारातील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अगदी वॉट्सअप इमोजी सारखे दिसणारे हे फोटो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. “अनेक लोक सिनेसृष्टीला कार्टून म्हणतात. त्यांच अगदी बरोबर आहे. आम्ही खरंच कार्टून आहोत. अरे नाही, आम्ही तर कूल कार्टून आहोत.” अशा आशयाची कॉमेंट त्यांनी या पोस्टवर केली आहे.
बिग बींचे कार्टून अवतारातील हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी बिग बींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 1:21 pm