News Flash

ऐश्वर्या-आराध्या करोनामुक्त; बिग बी म्हणाले…

बिग बींना आनंदाश्रू झाले अनावर

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या दोघींनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आराध्या आणि ऐश्वर्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. सोबतच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं म्हटलं आहे.

“आमची चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. देवा तुझी कृपा आहे”, असं ट्विट बिग बींनी केलं आहे.


दरम्यान, ऐश्वर्या आणि आराध्याची करोना चाचणी निगेटव्हि आली आहे. मात्र अद्यापही बिग बी आणि अभिषेक बच्चनवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 9:43 am

Web Title: amitabh bachchan could not hold back tears as aishwarya rai and aaradhya get discharge from the hospital ssj 93
Next Stories
1 सुशांतने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं होतं? स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा
2 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार
3 “सत्ता पिपासू लोकांमुळे लोकशाही धोक्यात येईल”; राजस्थान सत्ता नाट्यावर अभिनेता संतापला
Just Now!
X