भारतीय चित्रपटाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या अवचित्यानिमित्त बिटेनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेश्रणानुसार बॉलीवूड शेहनशाह अमिताभ बच्चन हे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले आहेत. ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिक दैनिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभ बच्चने हे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले असून दिलीप कुमार हे दुस-या तर बादशाह शाहरुख खान तिस-या स्थानावर आहे. प्रेक्षकांची मते, बॉक्स ऑफिस आकडेवारी, चित्रपटांचा प्रभाव आणि चित्रपट समीक्षकांची मते यांच्याआधारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन यांनी ४० वर्षाच्या कारकिर्दित ‘शोले’, ‘दिवार’सारखे यशस्वी चित्रपट केले आहेत. दरम्यान, चित्रपटसृष्टीपासून काही वर्षांसाठी दुरावल्यानंतार त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय गेम शोचे सूत्रसंचालन केले. आता या गेम शोच्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालनही बिगबी हेच करणार आहेत. मादाम तुसॉं संग्रहालयात पुतळा बसविण्यात आलेले ते पहिले बॉलिवूड अभिनेता आहेत. २०१२ साली झालेल्या ऑल्मिपिक स्पर्धेत अमिताभ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. चित्रपटसृष्टीतील कारकिर्द, प्रभाव, चाहत्यांची संख्या, भूमिकांमधील विविधता पाहता जागतिक चित्रपटाच्या इतिहासात अमिताभ हे महान अभिनेता आहेत, असे ‘शोबिझ’ मासिकाचे संपादक अस्जद नाझिर म्हणाले.
बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये माधुरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली असून या सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत तिने चौथे स्थान पटकावले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या शंभर उत्कृष्ट कलाकारांच्या यादीतील काही महत्त्वाची नावे : (कंसात यादीतील क्रमांक)
राज कपूर (५), Nargis (६), देव आनंद (७), वहिदा रहमान (८), राजेश खन्ना (९) आणि श्रीदेवी (१०), सलमान खान (११), आमीर खान (१४), धर्मेंद्र (१५), हेमा  मालिनी (१८), मधुबाला (२४), काजोल (30), ऋतिक रोशन (32), राणी मुखर्जी (३८), करिना कपूर (४३), मुमताज (50), सैफ अली खान (५९), प्रियंका चोप्रा (८६) आणि कतरीना कैफ (९३)